Gram Panchayat Election : शिंदे गटाने भास्कर जाधवांना घेरले; घरच्या मैदानावर चितपट करण्याची तयारी

Gram Panchayat Election : खेड तालुक्यात होणार्‍या १० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे.
Bhaskar Jadhav News
Bhaskar Jadhav NewsSarkarnama

Gram Panchayat Election : खेड तालुक्यात होणार्‍या १० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे. हे जरी खरे असले तरी ज्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यातील गुहागर मतदारसंघात येणार्‍या ग्रामपंचायतीत मात्र, ठाकरे गटासमोर शिंदे गटाने कडवे आव्हान उभे केले आहे.

गुहागर मतदारसंघ हा कोकणचे शिवसेनेचे (Shivsena) नेते विद्यमान आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील घाणेखुंट, भेलसई, कोंडीवली, निळीक, अलसुरे (गावपॅनेल बिनविरोध), भोस्ते आणि संगलट या सात ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. गत निवडणुकीत यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या भगवा डौलाने फडकत होता.

Bhaskar Jadhav News
Ajit Pawar News : अजित पवारांना सर्वोच्च न्यायालायाचा मोठा दिलासा

त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्याने गुहागर मतदार संघातील बर्‍याचशा ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या होत्या; मात्र, गेल्या काही महिन्यापूर्वी झालेल्या सत्तात्तरांच्या नाट्यमय घडामोडीनंतर कोकणातील बहुतांश भागात शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन कोकणात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुहागर मतदार संघातील घाणेखुंट, भेलसई, कोंडीवली, निळीक, भोस्ते, संगलट या ग्रामपंचायतीमधून ठाकरे विरुद्ध शिंदे गटाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.

त्यामुळे गुहागर मतदार संघात ठाकरे गटाला शिंदे गटाचे कडवे आव्हान असून भोस्ते, घाणेखुंट या महत्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळते. भोस्ते ग्रामपंचायतीमध्ये फक्त सरपंचपदासाठी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे भोस्तेत सरपंचपदासाठी चुरस पाहायला मिळत आहे.

Bhaskar Jadhav News
Ahmadnagar Politics News : नगरमध्ये भाजपला हवाय एक 'संग्राम'

घाणेखुंट ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासह ११ ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. घाणेखुंट ही लोटे औद्योगिक वसाहतीच्या नजीकची ग्रामपंचायत असल्यामुळे या ग्रामपंचायतीला मोठे वलय प्राप्त झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com