Mumbai : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले. फडणवीसांचा उल्लेख त्यांनी ‘जनरल डायर’ असा केला आहे. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टि्वट करीत भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.
"जिथे इच्छा तिथे मार्ग. जिथे इच्छा नसते तिथे समिती, उपसमिती, अहवाल आणि निष्कर्ष' असे भाजपचे नेते नितीन गडकरी कायम आणि देवेंद्र फडणवीस अधून मधून बोलत असतात. काल गिरीश महाजन आणि बाकीचे भाजप नेते आंदोलकांना भेटल्यावर त्यात एक शब्द अजून जोडायला हवा.. तो म्हणजे 'टाईमपास' किंवा 'वेळकाढूपणा'" असे अंबादास दानवेंनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) , आमदार नितेश राणे, आमदार मंगेश चव्हाण या नेत्यांनी सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची आंदोलनस्थळी जाऊन रविवारी भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा करताना उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली. पण ही मागणी धुडाकावून लावत जरांगे हे अध्यादेश निघत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले. यामुळे सरकार आणि उपोषणकर्त्यांमधील बैठक निष्फळ ठरली आहे.
जालन्यातील लाठीमार प्रकरणाची अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करण्यात येणार आहे, संजय सक्सेना हे आज (सोमवारी) जालन्यात दाखल झाले आहेत. "सक्सेसा यांच्या अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही.आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.