Nanded : आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात विविध ठिकाणी पुन्हा मोर्च काढण्यास सुरवात झाली आहे. सर्वपक्षीय नेत्यांना मराठा समाजाने मोर्चांपासून लांबच ठेवले आहे. आज नांदेड येथे निघालेल्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले होते. त्यांना मोर्चकरांनी रोखले. संतप्त मोर्चेकरांना पाहून दोन्ही आमदारांनी येथून काढता पाय घेतला. (Latest Marathi News)
"आमदार, खासदारांनी या मोर्चात सहभागी होऊ नये आणि आपली पोळी भाजून घेऊन नये," असा रोष मराठा युवकांनी व्यक्त केला. त्यानंतर हंबर्डे, राजूरकर हे मोर्चातून बाहेर पडले. मराठा समाज आक्रमक असून त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो, आम्ही मराठा समाजाच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया अमरनाथ राजूरकर यांनी दिली.
आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथी गृहात सुरु आहे. बैठकीत आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आजच घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठवाडा विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, परभणी, अहमद नगर, जालना, नांदेड, लातूर, या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीतील निर्णयाकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.