Chhagan Bhujbal News : महायुतीत जागा वाटपाची रेस, भुजबळांचे पायात पाय !

NCP Ajit Pawar Group Anniversary Program : विधानसभेला जागांचे वाटप करताना शिवसेना शिंदे गटाला जेवढ्या जागा दिल्या जातील तितक्याच जागा आम्हाला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका भुजबळ यांनी मांडली.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत जोरदार फटका बसल्यानंतर विधानसभेला सामोरे जाताना महायुतीतील सहभागी पक्ष शहाणे होतील, असे वाटत होते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यामध्ये आत्तापासूनच जागावाटपावर दावा करण्यास सुरूवात केली आहे. विधानसभेला जागांचे वाटप करताना शिवसेना शिंदे गटाला जेवढ्या जागा दिल्या जातील तितक्याच जागा आम्हाला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका भूजबळ यांनी मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापनदिनाचा कार्यक्रम सोमवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना छगन भुजबळ यांनी विविध विषयांवर रोखठोक मते मांडत सभागृह गाजविले. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या गोष्टींचा फटका आपल्या पक्षाला बसला आहे. त्या चुकांमध्ये सुधारणा करून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. लोकसभेसारखे महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांनी किती जागा लढवायाचा याचा निर्णय तातडीने घेतला पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकीत जागा वाटपांच्या चर्चेचे 'गुऱ्हाळ' शेवटपर्यंत चालविता येणार नाही.

विधानसभेचे जागा वाटप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला जेवढ्या जागा दिल्या जातील तितक्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मिळाल्या पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. लोकसभेमध्ये शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले. राष्ट्रवादीचा केवळ एकच खासदार विजयी झाला म्हणून तुम्ही कमी जागा घ्या, असे म्हणू नका, अशा शब्दात भुजबळ यांनी महायुतीच्या नेत्यांना सुनावले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत इतक्या जागा मिळाव्यात, अशी मागणी केली. तर लगेचच तुम्ही शांत बसा अशी भुमिका आपल्याच नेत्यांनी घेतली, हे योग्य नाही. तुम्ही म्हणाले बसा शांत मग बसतो शांत, अशा शब्दात त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना घरचा आहेर दिला.

Chhagan Bhujbal
Sunil Tatkare On Chhagan Bhujbal: विरोधी भूमिका,'घरवापसी'ची चर्चा; पण तटकरे भुजबळांना म्हणतात, तुम्हालाही पक्ष वाढवायचा...

निवडणुकीच्या प्रचारात तसेच जाहीर सभांमध्ये बोलताना आपण पुरोगामी महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकर यांच्या मार्गाने जात असल्याचे नेहमी बोलतो. मात्र आम्ही त्याच विचाराचे असून प्रत्यक्षात त्याच मार्गाने जात असल्याचे आपल्या सर्वांना दाखवावे लागेल. यासाठी अल्पसंख्याक, मुस्लिम यासह इतर समाजातील नेत्यांना एकत्र घेत त्या समाजाचे उमेदवार देखील देण्याचे काम करावे लागेल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना महायुतीच्या सर्व पक्षांनी एकत्रित राहण्याची भूमिका घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com