Legislative Council
Legislative Councilsarkarnama

Legislative Council Election : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला !

Legislative Council Election : निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सर्वच पक्षात हालचाली गतिमान झाल्या आहेत.
Published on

पुणे : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर आता पदवीधर मतदारसंघाची (Legislative Council Election) निवडणुकीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर, औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षकेत्तर मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.

शिक्षक किंवा पदवीधरांच्या मतदार संघांमध्ये राजकीय घुसखोरीचा मुद्दा सातत्याने चर्चेत असताना पुढल्या वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

Legislative Council
Rajasthan Congress : मुख्यमंत्री कोण ? ; पायलटांचे पोस्टर्स झळकले, गेहलोत गटाच्या तीन अटी

सर्वच पक्षात हालचाली गतिमान झाल्या आहेत. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

पदवीधर व शिक्षकांची नव्याने नोंदणी होणार आहे. १ नोव्हेंबर २०२२पासून होणार नविन मतदार नोंदणीला सुरवात होणार आहे. १ ऑक्टोबर से ७ नोव्हेंबर दरम्यान पदवीधर व शिक्षक मतदारांची नोंदणी सुरु राहणार आहे. २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणार येणार आहे. ता. ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com