Mumbai : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आज (गुरुवारी) सभागृहात बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. काल (बुधवारी) सभागृहात गोऱ्हे आणि पडळकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
पुरवणी मागण्यावर गोपीचंद पडळकर बोलत असताना सभापती डॉ.गोऱ्हे यांनी वेळेचे बंधन घालून त्यांना रोखले. त्यावेळी पडळकर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले, हातातील कागदपत्रे फाडून गोऱ्हे यांचा निषेध केला. "तुम्ही सभागृहाचे नियोजन नीट ठेवा, आम्ही बोलायला लागलो की बेल वाजवतात, सभागृहात तुम्ही मला जाणीवपूर्वक बोलू देत नाहीत," असा आरोप पडळकरांनी गोऱ्हे यांच्यावर केला.
पडळकरांच्या या कृतीवर उपसभापती रागावल्या. पडळकर यांचे वर्तन संसदीय परंपरेला अनुसरून नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तरी देखील पडळकर शांत होत नव्हते. अखेर डॉ. गोऱ्हे यांनी 'मार्शल'ना बोलावून सभागृहाबाहेर काढण्याचा पडळकरांना दम भरला. नीलम गोऱ्हे यांनी पडळकरांना चांगलच झापले.
पडळकर-गोऱ्हे यांच्यात वादात सचिन अहिर, नरेंद्र दराडे यांनी मध्यस्थी करीत पडळकरांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पडळकरांनी माघार घेतली. "माझी चूक नसतानाही मी माझे शब्द माघारी घेतो. पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही," असे सांगत पडळकरांनी या वादावर पडदा टाकला.
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी या वादावर पडदा टाकण्यासाठी प्रयत्न केला. "पडळकरांकडून गोऱ्हे यांच्याशी वाद घालण्याची जी कृती घडली त्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पडळकरांना आवश्यक त्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात येतील, असे सभागृहाला आश्वासित करतो," असे केसरकर म्हणाले.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.