मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच सगळीच राजकीय समीकरणं बदलून गेली आहेत. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीच्या यादीवरुन राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळाला होता. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच १२ आमदारांच्या नावाची यादी राज्यपालांना पाठवण्यावर एकमत झालं आहे. (Maharashtra Political latest news Update)
या १२ नावांसाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार लॅाबिंग सुरू असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आमदारांचं संख्याबळ पाहता भाजपला १२ पैकी ८ तर शिंदेगटाला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. आता या १२ नावांमध्ये नेमकी कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न शिंदे फडणवीसांसमोर आहे. २०१९च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या तसेच शिंदे आणि फडणवीसांवर विश्वास ठेवत पक्षात आलेल्या लोकांना जास्त संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याशिवाय विधानपरिषदेची टर्म संपलेले अनेक आमदारही पुन्हा लॅाबिंग करत असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 जणांची यादी दिली होती. मात्र, राज्यपालांनी ती शेवटपर्यंत मंजूर केली नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाही 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन राज्यपालांना टोला लगावला होता. आता ही नावं कधी पाठवली जाणार आणि कोणाकोणाला संधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- शिंदे गटातील या संभाव्य नावांची यादी
रामदास कदम
विजय बापु शिवतारे
आनंदराव अडसुळ किंवा अभिजित अडसुळ
अर्जुन खोतकर
नरेश मस्के
चंद्रकांत रघुवंशी
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.