Nawab Malik News : राहुल शेवाळे की अनिल देसाई? नवाब मलिकांचा कौल कुणाकडे?

Mumbai South Central Constituency : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात माहीम, वडाळा, शीव कोळीवाडा, चेंबूर आणि अणुशक्तीनगर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.
rahul shewale nawab malik anil desai
rahul shewale nawab malik anil desaisarkarnama

Mumbai News, 19 May : शिवसेनेची ( Shivsena ) स्थापना झाली त्या दादरचा समावेश असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात ( Mumbai South Central Constituency ) शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात चुरशीची लढत होत आहे. शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवनाचा समावेश असलेला हा परिसर ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेचा ठरला आहे. या मतदारसंघातील अणुशक्तीनगर भागाचा कौल कोणाकडे जाणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मलिक आमदार आहेत.

शिवसेना भवन, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे ( Rahul Shewale ) आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई ( Anil Desai ) या दोन शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांमध्ये चुरशीची लढत होत आहे. मुंबई महापालिकेची तिजोरी चार वर्षे राहुल शेवाळे यांच्याकडे होती. दहा वर्षांपूर्वी शिवसेनेनं संसदेत जाण्याची संधी शेवाळेंना दिली. पण, शिवसेना फुटीनंतर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. या दोन शिवसैनिकांचे भवितव्य निवडणुकीत ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात माहीम, वडाळा, शीव कोळीवाडा, चेंबूर आणि अणुशक्तीनगर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात अणुशक्तीनगर (नवाब मलिक, राष्ट्रवादी), चेंबूर (प्रकाश फातर्फेकर, ठाकरे गट), शीव सायन कोळीवाडा (कॅप्टन तमिळ सेल्वन, भाजप), वडाळा (कालिदास कोळंबकर, भाजप), धारावी (वर्षा गायकवाड, काँग्रेस) आणि माहीम (सदा सरवणकर, शिंदे गट) असे भाजपचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे गट व ठाकरे गटाचे प्रत्येकी एक आमदार आहेत.

अणुशक्तीनगर मतदासंघाचे आमदार नवाब मलिक यांची मदत कोणाला होते, हे महत्वाचं आहे. गोवावाला कंपाउंडमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं 23 फेब्रुवारी 2022 रोजी नवाब मलिकांना अटक केली होती. त्यानंतर दीड वर्षांनी अर्थात 14 ऑगस्ट 2023 मध्ये वैद्यकीय कारणासाठी मलिकांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मलिक हे अजित पवार गटाबरोबर आहेत. तरी, त्यांच्या महायुतीतील प्रवेशावर उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे विरोध दर्शविला होता. सध्या मलिक हे प्रचारात सक्रिय नाहीत. त्यामुळे मलिक यांच्या कार्यकर्त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.

rahul shewale nawab malik anil desai
Narendra Modi News : मोदी अन् शाह यांच्यानंतर भाजपला मते मिळवून देणारं नेतृत्व कोण?

अणुशक्तीनगर मतदारसंघात देवनार, ट्रॉम्बे, चित्ता कॅम्प, आरसीएफ वसाहत, मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर, बीएआरसी, मंडाळा गाव या भागांचा समावेश येतो. या मतदारसंघात दोन लाख 65 हजार 249 मतदार आहेत. या मतदारसंघात मराठी मतांखालोखाल मुस्लिमांचे प्राबल्य आहे.

त्यासह उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य मतदारांची संख्याही मोठी आहे. मागील दोन निववडणुकीत शेवाळे यांना या मतदारसंघातून मताधिक्य मिळालं होतं. 2019 च्या निवडणुकीत शेवाळेंना 63 हजार 253 मते मिळाली होती. तर त्यावेळी काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांना 54 हजार 604 मते मिळाली होती.

मतांचे अंदाजे प्रमाण -

  • मराठी - 39 टक्के

  • मुस्लिम - 30 टक्के

  • उत्तर भारतीय - 16 टक्के

  • दक्षिण भारतीय - 10 टक्के

  • गुजराती राजस्थानी - 3 टक्के

  • ख्रिश्चन - 1 टक्के

  • इतर - 1 टक्के

rahul shewale nawab malik anil desai
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रासह 'ही' पाच राज्य ठरविणार लोकसभा निवडणुकीचा निकाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com