Bharat Jodo Nyay Yatra : मोठी बातमी ! मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची तोफ धडाडणार

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' अत्यंत महत्वाची मानली जात आहे. ही यात्रा लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरू असलेली 'भारत जोडो न्याय यात्रा' 12 तारखेनंतर महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. राहुल गांधींची ही यात्रा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची मानली जात आहे. 'भारत जोडो न्याय यात्रा' महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिकसह पुढे ठाणे आणि मुंबई (Mumbai) अशी जाणार आहे. या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. (Marathi News)

'भारत जोडो न्याय यात्रे'च्या माध्यमातून राहुल गांधी ठिकठिकणी जाहीर सभा, भव्य रॅली, बैठका, घेणार आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात देखील राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे. 15 आणि 16 मार्चला राहुल गांधींची ही यात्रा ठाणे जिल्ह्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi
Maratha Reservation : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर बीडमध्ये 'सकल मराठा' समाजाने घेतला 'हा' निर्णय!

'भारत जोडो न्याय यात्रे'त (Bharat Jodo Nyay Yatra) ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागतासाठी मोठी तयारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेकडे अनेकांचे लक्ष लागले असून ते महाराष्ट्रात आल्यानंतर नेमकी काय बोलतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, 'भारत जोडो न्याय यात्रा' नाशिक (Nashik) जिल्ह्यात आल्यानंतर राहुल गांधी काळाराम मंदिराला भेट देणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आता राहुल गांधींही काळाराम मंदिराला भेट देणार आहेत.

आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार ?

आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. एकीकडे भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.तर दुसरीकडे 'इंडिया' आघाडीच्या देखील बैठकांचा धडाका सुरु आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असल्याची माहिती सांगितली जात आहे. मात्र, अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. लवकरच हा निर्णय जाहीर होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला नेमकी कसा असणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Rahul Gandhi
Maratha Reservation : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर बीडमध्ये 'सकल मराठा' समाजाने घेतला 'हा' निर्णय!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com