Mumbai News : लोकसभा उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून आणि उमेदवारांकडून निवडणुकांची जय्यत तयारी आणि प्रचाराचा धुरळा सुरू आहे. अशातच राजकीय टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोपांची धार वाढत आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जवळपास 20 जागांवर 'मॅच-फिक्सिंग झाल्याचा' आरोप केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांन उधाण आले आहे. (Lok Sabha Election News)
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. भाजपसोबत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) 20 लोकसभा मतदारसंघांच्या जागा फिक्स केल्या आहेत, असा राजकीय खळबळ उडवून देणारा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. कल्याण, बीड, बुलडाणा या मतदारसंघांच्या निवडणुका फिक्स झाल्या आहेत, असे आंबेडकर म्हणाले. (BJP-Mahavikas Aghadi alliance match-fixing on 20 seats Prakash Ambedkar allegations)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी हा गंभीर आणि खळबजनक आरोप केला आहेत. ते म्हणाले, "मी असे वीस लोकसभा मतदारसंघ सांगू शकतो, जिथे उमेदवारांची फिक्सिंग झाली आहे. बुलडाण्याची जागा जिथे शिवसेनेचा खासदार आहे, त्यांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उमेदवारी दिली आहे. त्याच ठिकाणी उद्धव ठाकरेंनी ज्यांना उमेदवारी दिली आहे, ती त्यांच्या पीएला दिली आहे. मग हे मॅच फिक्सिंग आहे की नाही?" असा सवाल आंबेडकरांनी विचारला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.