Lok Sabha Election: जिथे ताकद नाही, त्याच जागा काँग्रेसच्या वाट्याला; जागावाटपावर वर्षा गायकवाड नाराज

Lok Sabha Election 2024: मागील अनेक दिवसांपासून मविआच्या जागावाटपाचा घोळ कायम होता. मात्र, आज मंगळवारी (9 एप्रिल) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आघाडीकडून अंतिम जागावाटप जाहीर करण्यात आलं.
Varsha Gaikwad, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Varsha Gaikwad, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

Maha Vikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अखेर उर्वरित जागांवरील उमेदवारांची घोषणा केली.

त्यामुळे आता आघाडीच्या (MVA) अंतिम जागावाटपावर शिक्कामोर्तब झालं आहे. मागील अनेक दिवसांपासून मविआच्या जागावाटपाचा घोळ कायम होता. मात्र, आज मंगळवारी (9 एप्रिल) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आघाडीकडून अंतिम जागावाटप जाहीर करण्यात आलं.

या जागावाटपात शिवसेना (Shisvena) ठाकरे गटाला 21 जागा काँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा देण्यात आल्या आहेत, तर मागील अनेक दिवसांपासून वादात असलेली सांगली लोकसभेची (Sangli Lok Sabha) जागा ठाकरे गटाला तर भिवंडीची जागा शरद पवार (Sharad Pawar) गट लढवणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अनेक नेते या जागावाटपावर समाधानी नसल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनीदेखील या जागावाटपावर नाराजी दर्शवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस (Congress) पक्षाला समाधानकारक जागा मिळाल्या नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिथे काँग्रेस निवडणून येऊ शकते त्याच जागा दिल्या नाहीत. परंतु, जिथे काँग्रेसची ताकद नाही त्या जागा पदरी पडल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे. खासकरून दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचा आग्रह होता. या मतदारसंघातून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचे वडील एकनाथ गायकवाड दोनदा खासदार राहिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसची ताकद असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Varsha Gaikwad, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole
BJP Vs Congress : काँग्रेस ठाकरे, पवारांसोबत भरकटली; सांगली, भिवंडीवरुन भाजपचा निशाणा

हायकमांडच्या आदेशाचे सगळे पालन करतील

दरम्यान, आज महाविकास आघाडीचं जे जागावाटप झालं आहे. ते हायकमांडच्या आदेशाने झालं आहे. त्यामुळे हायकमांडच्या आदेशाचे सगळेच पालन करतील. लोकशाही, संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. त्यामुळे कार्यकर्ते हायकमांडचा आदेश पाळतील. शिवाय जे नाराज आहेत, त्याचं समाधान आम्ही करू, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Varsha Gaikwad, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Uddhav Thackeray News : "नरेंद्र मोदी भाकड अन् भेकड पक्षाचे नेते", उद्धव ठाकरेंचा थेट वार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com