Lok Sabha Election 2024 : राहुल गांधींच्या भेटीनंतर नसीम खान यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी

Naseem Khan News : मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खान यांनी नाराजी व्यक्त करत स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला होता.
Naseem Khan, Rahul Gandhi
Naseem Khan, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी शुक्रवारी पुण्यात राहुल गांधींची भेट घेतली. पुण्यातील प्रचारसभेत भाषण करत त्यांनी पुढील टप्प्यातही प्रचारात सक्रीय राहणार असल्याचे संकेत दिले. आता काँग्रेसने पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या 40 स्टार प्रचारकांच्या यादीत खान यांचाही समावेश केला आहे.

काँग्रेसकडून (Congress) महाराष्ट्रासाठी जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत सोनिया गांधी, राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी, मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह महाराष्ट्रातील नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, वर्षा गायकवाड आदी नेत्यांचा समावेश आहे. या यादीत नसीम खान (Naseem Khan) यांनाही स्थान देण्यात आले आहे.

Naseem Khan, Rahul Gandhi
Dhairyasheel Mohite Patil News : "फलटणमधून कंटेनर भरून माढ्यात येत आहेत, अजिबात रूपया सोडायचा नाही, पण..."

पाचव्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने मुंबईतील सर्वच मतदारसंघाची निवडणूक आहे. मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खान यांनी स्टार प्रचारक समितीचा राजीनामा दिला होता. महाराष्ट्रातून एकही मुस्लिम उमेदवार दिला नसल्याबद्दल खान यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात होते. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश आले आहे. शुक्रवारी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पुण्यात झालेल्या सभेत नसीम खान हे देखील उपस्थित होते. राहुल यांच्याशी चर्चा केल्यानंतर खान यांची नाराजी दूर झाली आहे. त्यामुळे त्यांचा पुन्हा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रामुख्याने वर्षा गायकवाड यांना दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Political News)

नसीम खान हे उमेदवारीसाठी इच्छूक होते. उत्तर मध्यसह मुंबईतील बहुतेक मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. नसीम खान यांच्या नाराजीचा फटका काँग्रेसला बसला असता, अशी चर्चा होती. त्यामुळे आता खान यांची नाराजी दूर झाल्याने महाविकास आघाडीला त्याचा फायदा होऊ शकतो.

Naseem Khan, Rahul Gandhi
Ashish Shelar News : 'महाविकास आघाडीने 18 जागा जिंकल्या तर राजकीय संन्यास घेईन' शेलारांचे ओपन चॅलेंज!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com