Eknath Shinde News : "श्रीकांत डॉक्टर, पण मी अनेकांच्या सर्जऱ्या केल्यात, काहींचे...", मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा

Kalyan Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदे यांच्या 'विकासदशक-दहा वर्षे प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची' हा कार्य अहवालाचं रविवारी प्रकाशन करण्यात आलं.
Eknath Shinde
Eknath Shindesarkaranama

Dombivli Political News : अहंकारी लोक आपल्या इगोसाठी राज्याचे नुकसान करताना आपण पाहिले आहेत. शेवटी सहकार्य योगदान मागायचं असतं. केंद्राकडून मदत मागणं किंवा राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून सहकार्य मागणे याच्यात काय लाज वाटली पाहिजे?

असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपस्थित केला. आम्ही केंद्रात, दिल्लीत लोटांगण घालायला जात नाही, तर राज्याच्या विकासासाठी आवश्यक काम करायला जातो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

"खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) हे विजयाची हॅटट्रिक करतील यात शंका नाही," असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde ) यांनी कल्याण लोकसभेचे (Kalyan Lok Sabha Election 2024) उमेदवार डॉ. शिंदे असतील हे पुन्हा एकदा डोंबिवलीत आयोजित कार्यक्रमात अधोरेखित केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा असलेल्या 'विकासदशक-दहा वर्षे प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची' या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीत पार पडला.

या वेळी खासदार डॉ. शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, प्रमोद हिंदुराव, जगन्नाथ शिंदे यांसह स्थानिक भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यादेखील उपस्थित होत्या. मान्यवरांच्या रांगेत त्यांना बसविण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. "श्रीकांत डॉक्टर आहे, मी डॉक्टर नसलो तरी मी काही सर्जरी केल्या आहेत. काही लोकांचे पट्टे गायब झाले पटापट, काही लोक फास्ट चालायला लागले तेदेखील गरजेचे होते," असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Eknath Shinde
Uddhav Thackeray News : 'जय भवानी' शब्दावर आक्षेप घेणाऱ्या आयोगाच्या नोटीसीला ठाकरेंकडून केराची टोपली

मनसेच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, "विकासाच्या मुद्द्यावर राज ठाकरे नेहमी सांगत असतात. माझ्याकडे येत असतात. सर्वसामान्य लोकांना न्याय हे आपलं सरकार देईल हा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे.

केंद्रातले मोदी सरकार या देशाला विकासाकडे नेत आहे म्हणून राज ठाकरे, रिपाइं, आरपीआय, आठवले गट, जानकर असे अनेक लोक आपल्याबरोबर आहेत. ही निवडणूकदेखील आपण विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत.

श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाविषयी बोलताना शिंदे भावनिक झाले. "मी आज आपल्यासमोर एक ट्रिपल रोलमध्ये आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता, मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि तुमच्या खासदाराचा पिता म्हणूनदेखील आपल्यासमोर आहे. त्याची गाडी राइट ट्रॅक आणि फुल स्पीडवर आहे. तो एक संसदत्न आहे. या सगळ्याचा मला अभिमान आहे.

दहा वर्षांचा पूर्वीचा आणि आत्ताचा श्रीकांत यामध्ये खूप फरक आहे. पहिली निवडणूक लढवून पाच वर्षांत कामाच्या माध्यमातून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. जाणीव आणि जबाबदारी असलेला लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे पाहायला समाधान वाटतं," असं कौतुक मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.

( Edited By : Akshay Sabale )

R.

Eknath Shinde
Uddhav Thackeray News : "आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून फडणवीस दिल्लीला जाणार होते, पण...", ठाकरेंचा मोठा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com