Lok Sabha Election 2024 : काळाचे काटे फिरले; एकेकाळचे 'कट्टर राजकीय दुश्मन' महायुतीमुळे एकत्र आले...

Kalyan Lok Sabha Election 2024 : राजकारणात कुणी कुणाचा कायम मित्र व शत्रू नसतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय येत आहे.
Kalyan Lok Sabha Election 2024 :
Kalyan Lok Sabha Election 2024 : Sarkarnama

Kalyan News : कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार जोरदार सुरु आहे. मात्र एकेकाळी शिंदे यांचे कट्टर विरोधक असेलले आणि मागील निवडणुकात त्यांच्याच विरोधात निवडणूक लढलेले मनेसेचे राजू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार समर्थक) आनंद परांजपे हे दोन्ही नेते मात्र यंदा महायुतीच्या आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात झोकून देऊन काम करत आहेत. यामुळे राजकारणात कुणी कुणाचा कायम मित्र व शत्रू नसतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय येत आहे. (Lok Sabha Election 2024)

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमामुळे आपण शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देत असल्याचे सांगितले. यानंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी आपला विरोधाची भूमिका गुंडाळून आता शिंदेंच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kalyan Lok Sabha Election 2024 :
Solapur NCP : लोकसभा निवडणुकीतून पवारांच्या राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी; बडे नेते लावले गळाला

दुसरीकडे आनंद परांजपे महायुतीच्या प्रचारात अद्याप तरी दिसून आले नाहीत. मात्र लवकरच कळवा व अंबरनाथ येथील महायुतीच्या मेळाव्यात परांजपे दिसणार आहेत. मात्र त्यांनी देखील आता श्रीकांत शिंदे यांना असलेला पारंपारिक विरोध बाजूला सारुन नरमाईची भूमिका घेतली आहे.

Kalyan Lok Sabha Election 2024 :
Sanjay Raut Vs Ajit Pawar: ...तर बारामतीत अजित पवार राजदूतवर दूध विकत असते!

एकेकाळचे कट्टर राजकीय वैरी झाले मित्र -

एकेकाळी लोकसभा (Lok Sabha Election) निवडणुकीत शिंदे, पाटील आणि परांजपे यांनी एकमेकांविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र आता नियतीन तिनही नेत्यांना महायुतीत एकत्र आणले आहे. त्यामुळे तिनही नेते एकत्र प्रचारात दिसणार आहेत.

Kalyan Lok Sabha Election 2024 :
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?

राजकारणात कुणी कुणाचा कायम मित्र नसतो तसं कायम मित्रही नसतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दरम्यान येणाऱ्या विधानसभा आणि पालिकेच्या निवडणुकीत हे नेते पुन्हा एकत्र दिसतील का ? पक्षाची भूमिका म्हणून हे एकत्र आलेत की खरेच त्यांचे मनोमिलन झाले आहे हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com