MVA Vs Vanchit : मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांनी आघाडीचा प्रस्ताव फेटाळला; जागांचा तेढ नेमका काय?

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीतील १५ जागांचा तेढ कायम असून आपसातील भांडण मिटवून चर्चा करण्याचे प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्यासाठी काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. आता काही तासांत लोकसभेची आचारसंहिता जाहीर होणार आहे. तत्पुर्वीच वंचितने आघाडीकडून दिलेला जागांबाबतचा प्रस्ताव फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. वंचितला चार जागांची अपेक्षा आहे, तर आघाडीकडून आकोल्यासह दोन जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. तो वंचितकडून अमान्य केला आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस या घटक पक्षांत अंतर्गत वाद आहेत. त्यांच्यात राज्यातील १५ जागांबाबत तेढ आहे. तो त्यांनी आधी मिटवावा त्यानंतर आमच्याशी चर्चा करावी, असे आंबेडकर वारंवार आवाहन करत आहेत. दरम्यान, आघाडीतील नेते आंबेडकारांशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. त्यातच शुक्रवारी आघाडीकडून वंचितला जागांबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यानंतर वंचितने तो प्रस्ताव फेटाळल्याची माहिती आहे.

आघाडीत वंचितला किती जागा द्यायच्या या मुद्द्यावरील चर्चा पुढे सरकताना दिसत नाही. त्यामुळे आंबेडकरांनी आपली नाराजी वारंवार जाहीर केलेली आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी आघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले. तसेच जागावाटपावर निर्णय होत नाही, त्याला वंचितच कारणीभूत असल्याचे स्पष केले. त्यावर प्रकाश आंबेडकर आणि राऊतांमध्ये तूतू-मैमै झाले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राऊत आघाडीतील चर्चांबाबत चुकीची माहिती देतात. आमच्या प्रस्तावावर काहीही निर्णय होताना दिसत नाही, असा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर शुक्रवारी आघाडीने तीन जागांचा प्रस्ताव वंचितला पाठवला. त्यात अकोला लोकसभेसह इतर दोन मतदारसंघाचा समावेश आहे. तो प्रस्तावर मात्र वंचितने फेटाळल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर आता वंचितची मागणी आघाडीकडून पूर्ण होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Edited by Sunil Dhumal

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com