Raj Thackeray News : महायुतीच्या पोस्टरवर राज ठाकरे, आमदार राजू पाटील; पण मनसैनिकांचं काय?

Raj Thackeray Suppport Mahayuti : राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसैनिकांनी पक्षाला गळती लागली आहे.
raju patil raj thackeray photo kapil patil banner
raju patil raj thackeray photo kapil patil bannersarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील ( Kapil Patil ) यांच्या जाहीर मेळाव्याच्या पोस्टरवर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि मनसे आमदार राजू पाटील ( Raju Patil ) यांचा फोटो लागला आहे. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याने भाजपने आता मनसेला आपल्या प्रचारात सहभागी करून घेतल्याचे बोललं जातं आहे. हे पोस्टर समाज माध्यमात व्हायरल होत असून, मनसेच्या पाठिंब्याची चर्चा होत आहे. भाजपने मनसे अध्यक्ष, आमदार यांचे फोटो बॅनरवर झळकवले तरी राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे दुखावलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपला किती मदत करणार? हे अद्याप गुलदस्तात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. "लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद असं काहीही नको, फक्त नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं म्हणून मी पाठिंबा जाहीर करतो," असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तर, महाविकास आघाडीने राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच राज ठाकरेंना त्यांच्याच पक्षातून धक्के बसू लागले आहेत. राज ठाकरेंची भूमिका अनाकलनीय आहे, असं म्हणत मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्यानंतर डोंबिवली मनसे शहर संघटक मिहीर दवते यांनीसुद्धा पक्षाचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

raju patil raj thackeray photo kapil patil banner
Raj Thackeray News : राज ठाकरेंच्या निर्णयावर भुजबळांनी केला 'हा' दावा!

दुसरीकडे भाजपचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील ( Kapil Patil ) यांच्या जाहीर मेळावाच्या पोस्टरवर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो लावण्यात आला आहे. मनसेला भाजपने पक्षाच्या बॅनरवर स्थान दिले असले तरी राज यांच्या भूमिकेने दुखावलेले पदाधिकारी, कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.


( Edited By : Akshay Sabale )

R

raju patil raj thackeray photo kapil patil banner
Raj Thackeray News : मनसैनिकांचे 'कन्फ्यूजन पे कन्फ्यूजन'; राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेने कोंडी !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com