Lok Sabha Election 2024 : 'वंचितचा स्वबळाचा निर्णय योग्यच; महाविकास आघाडीला लुटालूट...' ; आठवले स्पष्टच बोलले!

Ramdas Athawale News : महाविकास आघाडीच सामील होण्याची त्यांची इच्छा होती. पण त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Sarkarnama
Published on
Updated on

Dombivli News News : वंचित बहुजन आघाडीने एकट्याने निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकरांचा हा निर्णय योग्यच आहे. त्यांना इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत सामील व्हायची प्रकाश आंबेडकर यांची इच्छा होती. मात्र आता त्यांनी स्वबळावर लढण्याच्या निर्णय घेतला असून वंचितने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. महाविकास-आघाडीला लुटा-लूट करत आली नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीला टोला देखील लगावला आहे. डोंबिवलीमध्ये राज्यव्यापी दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेला त्यांनी उपस्थिती लावली होती.

Lok Sabha Election 2024
Nanded BJP News : नांदेडमध्ये चिखलीकरांच्या निवडणुकीची सुत्रं चव्हाणांच्या हाती..

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 'वंचितचा निर्णय योग्य आहे . वंचितकडून मल्लिकार्जुन यांना पत्र लिहिले गेले होते. महाविकास आघाडीच सामील होण्याची त्यांची इच्छा होती. पण त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे वंचितने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडी लुटालूट करु शकली नाही.

आठवले यांनी कविते पासून सुरवात केली -

"माझ्या नावामध्ये जरी असला राम तरी माझ आहे बौद्ध धर्माच काम" असे कविता म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सुरवात केली. ते म्हणाले, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. सर्वधर्मसमभावाची भूमिका आमची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका पुढे चालवायची असेल तर अखंड भारताची (India) भूमिका पुढे चालू ठेवली पाहिजे. या ठिकाणी दुसरी बौद्ध धम्म परिषद झालेली आहे बौद्ध धर्म हा मनाला शांततेच्या दृष्टीने नेणारा धर्म आहे. आगळी वेगळी परिषद आज येथे झाली आहे.

Lok Sabha Election 2024
BJP Vs NCP (Sharad Pawar) : निवडणुकीपूर्वीच कराड उत्तरेत 'या' मुद्द्यावरून भाजप अन् शरद पवार गटात कलगीतुरा!

बच्चू कडू नाराजी -

बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांचा वाद जुनाच आहॆ. त्याची नाराजी आणि विषय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मिटवावा, मी त्यांच्याशी बोलेल, बच्चू कडू यांची नाराजी मिटवाण्याच्या प्रयत्न करेन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com