Nanded BJP News : नांदेडमध्ये चिखलीकरांच्या निवडणुकीची सुत्रं चव्हाणांच्या हाती..

Political News : एकीकडे काँग्रेसमधील आपल्या समर्थकांना टप्याटप्याने भाजपात आणून चव्हाण आपली ताकद वाढवत आहेत. तर दुसरीकडे याच पक्ष प्रवेश सोहळ्यात प्रताप पाटील चिखलीकर यांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.
Ashok Chavan
Ashok Chavan Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : भाजपने नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकरांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर निवडणुकीची सगळी सूत्रे अशोक चव्हाणांनी हाती घेतली आहे. एकीकडे काँग्रेसमधील आपल्या समर्थकांना टप्याटप्याने भाजपात आणून चव्हाण आपली ताकद वाढवत आहेत. तर दुसरीकडे याच पक्ष प्रवेश सोहळ्यात प्रताप पाटील चिखलीकर यांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकारणाला वेगळेच वळण मिळाले आहे. चव्हाण यांनी एकीकडे सगळी काँग्रेस रिकामी करण्याचा धडाका लावला आहे, तर दुसरीकडे नांदेडमध्येच ठाण मांडून प्रताप चिखलीकर यांचा प्रचारही सुरू केला आहे. चिखलीकरांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशोक चव्हाण खरंच चिखलीकरांचे काम करतील का? अशा शंका उपस्थित केल्या जात होत्या. (Nanded BJP News)

Ashok Chavan
Prakash Ambedkar : नाना पटोले भाजपचे 'हस्तक'; प्रकाश आंबडेकरांचा गंभीर आरोप

चव्हाण यांनी आता त्या खोट्या ठरवत चिखलीकरांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे जिल्ह्यात फिरताना दिसत आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला पाठबळ देण्यासाठी चव्हाण आवाहन करत आहेत. भाजपने प्रचारात आघाडी घेतली असून यात अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे एकत्रितपणे दौरे करतांना दिसत आहेत.

अशोक चव्हाण यांचा राजकीय अनुभव चिखलीकरांपेक्षा अधिक असल्याने त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत पक्षाला व्हावा, यासाठी या दोन्ही नेत्यांनी जुनं सगळं विसरून हातात हात घेतल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात महायुती भक्कम तर महाविकास आघाडी चाचपडत असल्याचे बोलले जाते. काँग्रेसने माजी आमदार वंसत चव्हाण यांना उमेदवारी दिल्यानंतर या पक्षातील मरगळ काही प्रमाणात दूर झाल्याचे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील नेते जेव्हा चव्हाण (Ashok Chavan) यांच्या प्रचाराला नांदेडात येतील तेव्हा खऱ्या अर्थाने लोकसभेच्या लढाईला रंगत येणार आहे. सध्या तरी नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil chikhlikar) यांच्या विजयासाठी महायुतीचे नेते कामाला लागले आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत सध्या दिसत असली तरी अद्याप वंचित बहुजन आघाडीने आपले पत्ते उघडलेले नाहीत. वंचितच्या निर्णयानंतरच नांदेड मधील लढत दुरंगी होणार की तिरंगी? हे ठरणार आहे.

(Edited by : Sachin Waghmare)

Ashok Chavan
Ashok Chavan News : 'तेव्हा जर मी भाजपमध्ये जाण्याचं धाडस दाखवलं नसतं, तर..' ; अशोक चव्हाणांचं विधान!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com