Lok Sabha Election 2024: आंबेडकरांच्या 'त्या' आवाहनाविरोधात आठवलेंचा एल्गार, म्हणाले, "बाबासाहेबांचे स्वप्न ..."

Ramdas Athawale On Mahavikas Aghadi: महायुती देशात चारशे आणि राज्यात 40 लोकसभेच्या जागा जिंकणार. भाजप झोपणार नाही, तर दुसऱ्यांना झोपवण्यासाठी मैदानात उतरली आहे असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.
Ramdas Athawale, Prakash Ambedkar
Ramdas Athawale, Prakash Ambedkarsarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024: रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी संविधान धोक्यात नसून महाविकास आघाडी धोक्यात आहे, असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला. शिवाय प्रकाश आंबेडकरांच्या आवहानाविरोधात भाजपला मतदान करण्याचं वक्तव्यदेखील आठवलेंनी केलं. तसंच महायुती देशात चारशेहून अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

उल्हासनगरमधील (Ulhasnagar) जुने दलित पँथरचे कार्यकर्ते बाबुराव गोडबोले यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. गोडबोले यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) आज उल्हासनगरात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुती देशात चारशे आणि राज्यात 40 लोकसभेच्या जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उल्हासनगर मध्ये भाजपविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. आंबेडकरांच्या या आवाहनाला आठवलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. आठवले म्हणाले, भाजप झोपणार नाही, तर दुसऱ्यांना झोपवण्यासाठी भाजप मैदानात उतरली आहे. शिवाय त्यांच्यासोबत रिपब्लिकन पार्टी आहे. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचा पक्ष भाजपसोबत आहे, असं ते म्हणाले.

Ramdas Athawale, Prakash Ambedkar
Anil Desai News : महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर; अनिल देसाईंना केला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध

संविधान धोक्यात नाही तर...

यावेळी आठवले यांनी विरोधकांच्या संविधान धोक्यात असल्याच्या वक्तव्यावरदेखील भाष्य केलं. आठवले म्हणाले, विरोधक म्हणत आहेत की, संविधान धोक्यात आहे, मात्र सध्या संविधान धोक्यात नसून त्यांचे पक्ष धोक्यात आहेत, महाविकास आघाडी (MVA) धोक्यात आहे, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com