Anil Desai News : महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर; अनिल देसाईंना केला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध

Political News : दक्षिण-मध्य मुंबईमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. त्यामुळे सर्वांचे या लढतीकडे लक्ष लागले आहे.
Anil Desai
Anil Desai Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पाचव्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्षांत प्रचाराची गडबड सुरु आहे. दुसरीकडे सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच दक्षिण-मध्य मुंबईमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. त्यामुळे सर्वांचे या लढतीकडे लक्ष लागले आहे.

दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई (Anil Desai) यांनी प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यासाठी सध्या ठिकठिकाणी सभा आणि बैठका ते घेत आहेत. चेंबूरमधील पांजरपोळ या ठिकाणी ते गेले असता काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचा प्रकार घडला. यावेळी काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी या भागात प्रचार करण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे वातावरण काहीसे तापले होते. (Anil Desai News)

Anil Desai
Pune Political News : निर्णायक 'वडगाव शेरीत' बदललेल्या मतदानाच्या आकडेवारीने कुणाची वाढली धाकधूक?

चेंबूरमधील पांजरपोळ या भागात अनिल देसाई यांचा कार्यकर्त्यासोबत वाद झाल्याचा प्रकार समोर आला या आहे. त्यांनतर या ठिकाणाहून देसाईंना निघून जावे लागले, त्यांनी या ठिकाणी प्रचार करू नये, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर शिवसेना व काँग्रेस कार्यकर्त्यात बाचाबाची झाली. त्यानंतर देसाई यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

या घटनेमुळे मविआमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई चेंबूर पांजर पोळ परीसरात प्रचारासाठी आले असताना स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे आता हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून काय पावलं उचलली जातात, हे पाहावं लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये विधानसभेचे अणुशक्तीनगर आणि चेंबूर हे मुंबई उपनगर जिल्ह्यातले दोन मतदारसंघ येतात. तर मुंबई शहर जिल्ह्यातले धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्याठिकाणी भाजपचे कॅप्टन तामिळ सेल्वन हे सायन कोळीवाड्याचे, भाजपचे कालिदास कोळंबकर हे वडाळ्याचे आणि शिवसेनेचे सदा सरवणकर हे माहीमचे आमदार आहेत. राहुल शेवाळेंना या तीन आमदारांचा पाठिंबा आहे.

चुरशीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष

चेंबूरमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि धारावीतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार आहेत. या दोन्ही आमदारांचा अनिल देसाईंना पाठिंबा आहे. तर नवाब मलिक हे अणुशक्ती नगरचे आमदार आहेत. त्यांनी अद्याप कॊणाला पाठींबा दर्शविला नाही. त्यामुळे या ठिकाणची लढत चुरशीची होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Anil Desai
Anil Desai : अहो आर्श्चयम्‌...शिवसेना माजी खासदारांच्या नावाने वाहन नाही

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com