Narendra Modi : "मोदींसारख्या तपस्वी, ध्यानस्थ अन् ध्यानमग्न माणसाला 800 जागा मिळाल्या पाहिजेत"

Sanjay Raut On Narendra Modi : "तुम्हाला सहज जिंकण्याची खात्री असेल, तर ध्यान, तपस्या आणि धमक्या देऊन निवडणूक जिंकता येत नाही"
Narendra Modi
Narendra Modisarkarmama

Mumbai News, 2 June : कोणत्याही माध्यमांनी किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलं नाही. एक्झिट पोलचे आकडे हे ठरवून दिलेले आहेत. राजस्थानमध्ये 26 जागा आहेत. पण, एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भाजपला ( bjp ) 33 जागा दाखवल्या आहेत.

आता असं वाटतंय की हे सर्व मिळून भाजपला 800 ते 900 जागा देतील, अशी खोचक टिप्पणी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( Narendra Modi ) ध्यान केलं आहे. कॅमेरे लावून ध्यान केलं, साधना आणि तपस्या केली. त्यामुळे 360 ते 370 जागा काहीच नाहीत. अशा तपस्वी आणि ध्यानस्थ, ध्यानमग्न माणसाला 800 जागा मिळाल्या पाहिजेत. तरच, ते ध्यान मार्गी लागलं, असं बोलू शकतो," असा टोला संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) लगावला आहे.

"धमक्या देऊन निवडणूक जिंकता येत नाही"

"अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा पोल आहे. ओपिनियन आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षांत चुकीचे ठरतात. भाजप आणि गृहमंत्रालय यंत्रणांवर कशाप्रकारे दबाव टाकतंय हे सर्वांना माहिती आहे. जयराम रमेश यांनी शनिवारी महत्वाचा मुद्दा मांडला. गेल्या 24 तासांमध्ये गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी देशातील किमान 180 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून जवळजवळ धमकावलं आहे. या धमक्या कशासाठी आहेत, हे मी सांगण्याची गरज नाही. तुम्हाला सहज जिंकण्याची खात्री असेल, तर ध्यान, तपस्या आणि धमक्या देऊन निवडणूक जिंकता येत नाही," अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आम्ही सरकार बनवत आहोत"

"इंडिया आघाडी देशात सरकार बनवणार आहे. 295 ते 310 जागा हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे. महाराष्ट्रात आणि देशात काय होणार हे मला माहिती आहे. आम्ही सरकार बनवत आहोत. कोणी किती आकडे दाखवू. एक्झिट पोल बनविणाऱ्या 100 कंपन्या आहेत. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असं एक्झिट पोलचं आहे," असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com