जुई जाधव :
Mumbai News: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. ठाकरे गट देखील अॅक्शन मोडवर आला असून दक्षिण मुंबईत जोरदार तयारी केली आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यासाठी आता खुद्द युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे मैदानात उतरणार आहेत.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 6 जानेवारीला आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. गिरगाव येथे विभाग क्रमांक 12 च्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, अरविंद सावंत यांना भाजपकडून तगड आव्हान असण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
येणाऱ्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. गेल्या दोन वर्षांत दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली. त्यामध्ये शिवसेनेतील फूट ही आतापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी मानली जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शह देण्याचा पूर्ण प्रयत्न असणार आहे.
यासाठी ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबईत सर्वात महत्त्वाचा असलेल्या मतदारसंघात जोरदार तयारी करण्यात येत आहे. याअगोदर शाखानिहाय बैठका, लोकसभा आढावा, विधानसभानिहाय बैठका तसेच इतर कार्यक्रम देखील ठाकरे गटाकडून घेण्यात आले होते. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठका देखील घेतल्या होत्या. दक्षिण मुंबईसाठी भाजपही जोरदार तयारी करत आहे. अरविंद सावंत यांच्या निवडीवरून अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते.
दरम्यान, लोकसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या अनुषंगाने आता राज्यात एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठका, सभा, मेळावे घेण्याचा धडाका लावला आहे. तसेच राजकीय नेत्यांचे दौरे देखील मतदारसंघात वाढले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही मैदानात उतरले आहेत.
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.