Thane News : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मैदान दिवसेंदिवस रंगत वाढताना दिसत आहे. महाविकास आघाडी असो किंवा महायुती यांच्याकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असताना, एक अनोखा ट्विस्ट आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्र धाडून थेट पाठींबा मागितला आहे. मात्र वंचितने पक्षांध्यक्षांकडून पत्र आल्यास विचार पाठिंबा देण्याबाबत विचार करु, अशी भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे वंचित पत्र पाठवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सद्यस्थितीत करो या मरो अशी स्थिती आहे. त्यातच शिंदे गटाने उशिरा उमेदवार मैदान उतरवला असला तरी शिंदे सेनेने मतदारसंघात आघाडी घेतल्याचे पाहण्यास मिळत आहे. चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मैदान उतरल्याने या लढतील वेगळीच रंगत आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच ही लढत दोन गटाच्या प्रमुखांच्या प्रतिष्ठेची होऊन बसली आहे. शिवाय या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला होता. मात्र त्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला. पण, मागच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पारड्यात 47 हजार 432 मतदारांनी मते टाकली होती. ही बाब लक्षात घेऊन बहुदा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी प्रकाश आंबेडकर यांनी पत्राद्वारे पाठींबा मागितला असावा.
या पत्राला अनुसरून वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी विचारे यांना पत्राद्वारे उत्तर पाठविले आहे. त्यामध्ये विचारे यांना सस्नेह जय भीम, जय महाराष्ट्र (Maharashtra) असे म्हटले आहे. तसेच आपले 25 - ठाणे लोकसभा मतदार संघासाठी पाठींबा मिळणे बाबतचे पत्र मिळाले. आपण पाठविलेल्या पत्राबद्दल आभार. पण, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने ठरविलेल्या धोरणानुसार, ज्या पक्षाला वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा हवा आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षाने स्वतःच्या सहीचे पत्र द्यायला पाहिजे, तरच त्या संदर्भात विचार करता येईल, असे नमूद केले आहे.
याशिवाय आपण पाठविलेल्या पत्राबद्दल पुन्हा एकदा आभार, असे म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे हे पत्र पाठवणार का? आणि पाठवलेल्या पत्राला वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) पाठींबा देणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. (Lok Sabha Election 2024)
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.