Pimpri News : मावळ लोकसभेत ३३ उमेदवार आहेत. त्यातील महायुतीचे श्रीरंग बारणे आणि त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी आघाडीचे संजोग वाघेरे यांच्यासह वंचित बहूजन आघाडीच्या माधवी जोशी यांना निवडणूक खर्चातील तफावतीबद्दल निवडणूक आयोगने सोमवारी (ता.६)नोटीस बजावली.इतर सहा अपक्षांनी,तर तो हा खर्च तपशीलच सादर न केल्याने त्यांच्याविरुद्धही ती जारी करण्यात आली आहे.
मावळमधील दहा टक्के उमेदवारांना या नोटीसा बजावण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने यावेळी प्रथमच कुठल्या,तरी मतदारसंघात या नोटीसा जारी झाल्या आहेत.त्यातही या तिरंगी शर्यतीतील आघाडी, महायुती आणि वंचित अशा तिन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना ती काढण्यात आल्याने त्याची मोठी चर्चा झाली आहे. मावळमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आय़ोगाने या नोटीसा बजावल्या आहेत.
उमेदवारांच्या रोजच्या खर्चाच्या पहिल्या फेरीच्या तपासणीतच एवढ्या मोठ्या संख्येने नोटिसा मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी आज काढल्या. शिवाजी किसन जाधव, सुहास मनोहर राणे, इन्द्रजीत धर्मराज गोंड, इकबाल इब्राहिम नावडेकर, लक्ष्मण सदाशिव अढाळगे, अजय हनुमंत लोंढे या उमेदवारांनी निवडणुकीतील दैनंदिन खर्चाचा हिशोबच न दिल्याने त्यांना ही नोटीस बजावण्यात आली.
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
त्यान्वये याप्रकरणी लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार कारवाई होईल,असा इशारा देण्यात आला आहे.तसेच ४७ तासांत म्हणजे दोन दिवसात याबाबत खुलासा सादर करण्यास या उमेदवारांना सांगण्यात आले आहे.पुढील दुसऱ्या तपासणीवेळी सदर खर्चाचा हिशोब न दिल्यास फौजदारी होईल तसेच तसेच वाहने, सभा इत्यादीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तत्काळ रद्द करण्यात येतील, असे बजावण्यात आले आहे.
तर, दररोजचा हिशोब दिला, पण त्याचा मेळ बसला नाही, त्यात तफावत आढळली म्हणून वाघेरे, बारणे आणि जोशी यांनाही आयोगाने नोटीस दिली आहे. त्यांनी दिलेल्या खर्चाची तपासणी केली असता तो निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने नोंदविलेल्या शॅडो रजिस्टरसोबत जुळला नाही.
त्याच्याशी तुलना करता तो खरा व योग्य वाटत नाही,अथवा त्यांनी काही खर्च दडवल्याचे आय़ोगाला दिसून आले. आढळलेल्या तफावत़ीची रक्कम देखील नोटीसमध्ये देण्यात आली आहे.त्यांनाही अपक्षांप्रमाणे खुलासा देण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.