Uddhav Thackeray News : "...तर नरेंद्र मोदींचा उदयच झाला नसता"; उद्धव ठाकरेंनी काढली प्रमोद महाजनांची आठवण

Uddhav Thackeray On Narendra Modi : शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र वापरून मते मागण्याची वेळ भाजप आणि मोदींवर आली आहे, अशी टीका ठाकरेंनी केली आहे.
uddhav thackeray pramod mahajan narendra modi
uddhav thackeray pramod mahajan narendra modisarkarnama

Mumbai News, 18 May : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाजन ( Poonam Mahajan ) यांचा पत्ता कापण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी सरकारी वकील उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam ) यांना तिकीट देण्यात आलं आहे. याचवरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वर्गीय, भाजप नेते प्रमोद महाजन ( Pramod Mahajan ) यांची आठवण काढत भाजपला ( bjp ) लक्ष्य केलं आहे. "प्रमोद महाजन यांचं भाजपच्या वाढीत मोठं योगदान होतं. दुर्दैवानं याच भाजपनं महाजनांची कन्या पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारली," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

शिवसेनेला हिंदुत्व शिकविण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्यावर निशाणा साधला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरेंनी म्हणाले, "पंतप्रधन मोदी यांनी कल्याणमध्ये गद्दाराच्या मुलाला निवडून देण्याचं आवाहन करण्यासाठी सभा घेतली. मात्र, महाराष्ट्रात भाजपची पाळेमुळे रूजविण्यासाठी खस्ता खाललेल्या प्रमोद महाजन यांच्या मुलीला उमेदवार का नाकारली याचं उत्तर भाजपची मंडळी देत नाहीत."

"प्रमोद महाजन आज हयात असते, तर नरेंद्र मोदी यांचा उदयच झाला नसता. महाजन हेच पंतप्रधान झाले असते. प्रमोद महाजन हे एक वेगळ्या उंचीचे नेते होते. भाजपच्या वाढीत त्यांचं योगदान मोठं होतं. दुर्दैवानं याच भाजपनं महाजनांची कन्या पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारली,"

"शिवसेनेला हिंदुत्व शिकविण्याचा कोणी प्रयत्न करू नये. मोदींना हिंदुहृदयसम्राट व्हायचं आहे. मात्र, हिंदुहृदयसम्राट एकच आणि ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. जनतेनं बाळासाहेबांना ही पदवी दिली होती. हिंदुहृदयसम्राट होता येत नाही, ही तर त्यांची पोटदुखी आहे. त्यातूनच मोदींनी शिवसेना फोडली. त्याच शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र वापरून मते मागण्याची वेळ भाजप आणि मोदींवर आली आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

"पंतप्रधान मोदी यांनी माझ्या आजारपणात भावासारखी काळजी घेतल्याचं सांगितलं. आज त्यांच्या भावामध्ये आणखी एकाची वाढ होईल. कदाचित या भावाच्या घरीही ते जातील," अशी टोलेबाजी राज ठाकरेंचा नामोल्लेख टाळत उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com