Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे करणार काँग्रेसला मतदान; म्हणाले, वर्षा गायकवाडांना...

Uddhav Thackeray On Varsha Gaikwad: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा तसेच उत्तर मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित केलं.
Uddhav Thackeray, Varsha Gaikwad
Uddhav Thackeray, Varsha GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray On Varsha Gaikwad: माझं मत मी वर्षाताईंला देणार आहे, मी तिचा मतदार आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड ही निवडणूक जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती.

या पत्रकार परिषदेत बोलनाता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) वर्षा गायकवाड यांना खासदार करुन दिल्लीला पाठवणार असल्याचं सांगितलं. तसंच ठाकरेंनी यावेळी मी माझं मतदेखील पंजाला म्हणजेच वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना देणार असल्याचं सांगितलं. तसंच, वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळं त्या कुठूनही लढू शकतात आणि जिंकू शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पत्रकारांनी महायुतीच्या उमेदवाराबद्दल प्रश्न विचारला असता ठाकरे म्हणाले, महायुतीबरोबर आम्ही आघाडी केलेली नाही, त्यामुळं त्यांच्या उमेदवाराचं काही सांगू शकत नाही, असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं. तर वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ (Mumbai North Central Lok Sabha Constituency) नवखा आहे, त्यामुळे ही निवडणूक त्या कशी लढवणार? असा प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या, "मागील 10 महिन्यांपासून मी या मतदारसंघात राहत आहे. त्यामुळं हा मतदारसंघ मला नवा नाही."

तसेच मुंबईतील सर्व म्हणजेच सहा जागा महाविकास आघाडीच्या (MVA) निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून 2004 ची पुनरावृत्ती होईल, असं गायकवाड म्हणाल्या. यावर उद्धव ठाकरेंनी त्यांचं बोलणं मधेच थांबवत 'वर्षाताई माझं मतंही तुलाच मिळणार,' मी तिचा मतदार आहे, शिवाय मी तिला अरेतुरे बोलतो कारण मी तिला माझी लहान बहिण मानतो. पंजाला पहिल्यांदा मतदान करत असलो तरी त्या हातामध्ये मशाल आहे. त्याचा एकत्रित परिणाम होईल आणि त्यानंतर मी तुतारी फुंकणार आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray, Varsha Gaikwad
Bharti Pawar News : 'भारती पवारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा...', युवा मोर्चा जिल्हाध्यक्षाचा थेट उल्लेख

तसेच यावेळी ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली. ते म्हणाले, ज्या लोकांवर आधी भ्रष्टाचाराचे आरोप केले मग ते 70 हजार कोटींचा घोटाळा असो वा शिखर बँक घोटाळ्याचे आरोप तुम्हीच करत होता. मात्र ते लोक तुमच्याकडे आल्यानंतर त्यांना क्लीन चीट कशा मिळाल्या, असं लोकं विचारत असल्याचंही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray, Varsha Gaikwad
Sanjay Raut News: "आमचा सामना चोरलेल्या शिवसेनेबरोबर", राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

मागील अनेक दिवसांपासून मुंबईतील काही मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीमध्ये तिढा होता. मात्र अखेर मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी आता काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी भाजपने अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com