Vanchit News : ठाण्यात वंचित बहुजन आघाडीची खेळी अर्ज छाननीत फेल

Thane Lok Sabha Constituency : ठाणे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारासह 11 उमेदवारांचे अर्ज अवैध; छाननीअंती 25 उमेदवारांचे 32 नामनिर्देशनपत्रे वैध
Thane Lok Sabha Constituency
Thane Lok Sabha Constituency Sarkarnama

Thane Political News : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्लात कल्याणसह ठाणे या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करत गुगली टाकली होती. मात्र, त्याच गुगलीत वंचित आघाडीच्या ठाण्यातील उमेदवार डॉ. रामराव तुकाराम केंद्रे यांचा अर्ज छाननीत बाद झाला आहे. केंद्रे यांच्यासह 11 उमेदवारांचे अर्ज ठाण्यात अवैध ठरले आहे. तर 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

वंचित बहुजन विकास आघाडीने Vanchit उमेदवार देताना, महापालिका सेवानिवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी दिल्याने ठाण्यात रंगतदार लढत होईल असे म्हटले जात होते. पण, अर्ज अवैध ठरल्याने वंचित आघाडीचे ठाण्यात निवडणूक लढण्याचे स्वप्न यंदा भंगल्याचे दिसत आहे. आता अर्ज केलेल्या उमेदवारांना 6 मे 2024 पर्यंत आपला उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्यानंतरच ठाण्यातील लढतीबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.

ठाण्यात उमेदवार दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शनिवारी (ता. 4) पार पडली. या छाननी प्रक्रियेत 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर 25 उमेदवारांचे 32 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये -धुळे यांनी दिली आहे.

या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर 36 उमेदवारांनी एकूण 43 अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जांची छाननी करण्यात आली. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जांची 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी छाननी केली. यामध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार डॉ केंद्रे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.

Thane Lok Sabha Constituency
Raj Thackeray Konkan : उद्धव ठाकरे अन् नारायण राणे यांच्यात 'असा' फरक; राज ठाकरे नेमके काय म्हणाले?

वंचितच्या उमेदवारासह आतिकूर रेहमान शेख (भारतीय राष्ट्रीय पार्टी), अजय तुळशीराम मगरे (अपक्ष), अब्दुल रेहमान शकील खान (अपक्ष), जयदीप विनयकुमार कोर्डे (अपक्ष), संतोष रघुनाथ कांबळे (अपक्ष), प्रशांत रघुवीर अहिरवार (अपक्ष), जुबिन रज्जाक पटवे(अपक्ष), सुनील श‍िवाजी राठोड (राष्ट्रीय मराठा पार्टी), रामेश्र्वर सुरेश भारद्वाज (हिंदुस्थान मानव पक्ष) तसेच मोहम्म्द इक्बाल मोहम्मदअली बाशे(अपक्ष) अशा अकरा जणांचे अर्ज बाद ठरले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता या लोकसभा मतदारसंघात 25 उमेदवार वैध ठरलेले आहेत. त्यातील राजन विचारे Rajan Vichare (शिवसेना - ठाकरे गट) यांचे चार अर्ज, नरेश म्हस्के (शिवसेना-शिंदे गट) यांचे चार अर्ज, संतोष भिकाजी भालेराव (बहुजन समाज पार्टी) यांच्यासह इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मात्र राजन विचारे आणि नरेश म्हस्के यांच्यातच टशन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Thane Lok Sabha Constituency
Rishi Sunak News : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना धक्का, पक्षाचा मोठा पराभव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com