Rishi Sunak
Rishi Sunaksarkarnama

Rishi Sunak News : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना धक्का, पक्षाचा मोठा पराभव

Britain local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करूनही आणि एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत हुजुर पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
Published on

Political News: ब्रिटनमध्ये झालेल्या पोटनिवडणुक आणि स्थानिक निवडणुकीत सत्ताधारी पंतप्रधान ऋषी सुनक Rishi Sunak यांच्या हुजुर पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मागील 40 वर्षांमधील हुजूर पक्षाची ही सर्वात दारुण कामगिरी असल्याचे सांगितले जात आहे. उद्या (रविवार) पर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील. मात्र, या निवडणुकीत हुजूर पक्षाची तब्बल 26 टक्के मतदार हे विरोधी मजुर पक्षाकडे गेल्याचे दिसून येत आहे.

Rishi Sunak
CV Ananda Bose : ऐन लोकसभेच्या धामधुमीत राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; काय आहे प्रकरण?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत Election आघाडी करूनही आणि एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत हुजूर पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पोटनिवडणूक झालेल्या पराभवामुळे ब्रिटनची जनता सत्ता बदल्याचे मूडमध्ये असल्याचा दावा मजुर पक्षाचे नेते करत आहेत. ब्लॅकपूल साऊथमध्ये मजूर पक्षाचे उमेदवार ख्रिस वेब यांनी हुजुर पक्षाचे उमेदवार डेव्हिड जॉनचा पराभव केला. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या काळात 2019 मध्ये ही जागा हुजूर पक्षाने जिंकली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

26 टक्के मते हुजुरपक्षाकडून मजूर पक्षाकडे

या निवडणुकीत, 26 टक्के मते हुजुर पक्षाकडून मजूर पक्षाकडे वळली आहेत. 1945 नंतरच्या पोटनिवडणुकीतील हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. रविवार पर्यंत स्थानिक निवडणुकीचे निकाल येतील मात्र येथे देखील मजुर पक्ष पहिल्यापासूनच आघाडीवर दिसत आहे.

ऋषी सुनक यांच्यावर दबाव

या वर्षा अखेर ब्रिटनच्या संसदेच्या निवडणूक होणार आहे. मात्र, स्थानिक निवडणुकीत आणि पोटनिवडणुकीत हुजूर पक्षाची झालेली पि‍छेहाटीने पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर दबाव वाढणार आहे. मजूर पक्षाच्या विरोधासोबत सुनक यांना पक्षांतर्गत विरोधाला देखील सामोरे जावे लागणार आहे.

Rishi Sunak
Loksabha Election 2024 : फिरोज गांधींपासून सुरु झालेली रायबरेलीच्या विजयाची कौटुंबिक परंपरा राहुल जपणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com