Lok Sabha Election 2024 Voting : पवईतील मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, ठाकरे गटाचे आदेश बांदेकर संतापले

Lok Sabha Election 2024 News : एका महिलेने म्हटले आहे की, 1001% खरी गोष्ट आहे. कल्याण आणि डोंबिवलीत तर मतदानाचा यादीत नावच नाही, अशी परिस्थिती आहे.
Aadesh Bandekar
Aadesh Bandekarsarkarnama

Lok Sabha Election : पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी मुंबईतील सर्वच लोकसभा मतदारसंघात मतदारांनी रांगा लावल्या आहेत. मात्र, पवई मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले. तब्बल चार तास रांगेत थांबून अचानक ईव्हीएम बंद असल्याचे सांगितल्याने ज्येष्ठ नागरिक संतप्त झाले. या मतदान केंद्रावरील व्हिडीओ काढून अभिनेते, ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी हा व्हिडीओ आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवरून प्रसिद्ध केला आहे.

Aadesh Bandekar
Nashik Lok Sabha Election 2024 : भाजप आमदार देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची !

बांदेकर म्हणाले, ईव्हीएम EVM बंद आहे. सगळ्या मशनरी बंद आहे. हिरानंदनी फाऊंडेशनच्या येथे असलेल्या मतदान केंद्रावर हा गोंधळ सुरू होता. बांदेकर यांनी मतदान केंद्रावर Polling station उभा असलेल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा घेतल्या. प्रतिक्रिया देणाऱ्या नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला. काही सुरू आहे काहीच कळत नाही, आम्ही दोन ते तीन तास रांगेत होतो. मात्र, ईव्हीएम बंद असल्याचे सांगितले जात आहे, अशी प्रतिक्रिया एका महिला देताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बांदेकर यांच्या इन्टाग्रामवरील व्हिडिओवर नागरिकांनी कमेंटमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका महिलेने म्हटले आहे की, 1001% खरी गोष्ट आहे. कल्याण आणि डोंबिवलीत तर मतदानाचा यादीत नावच नाही, अशी परिस्थिती आहे. आणि बहुतेक नावं अशा मतदारांची आहेत जे हयात नाही. दुःखद बाब आहे आणि हे निवडणूक आयोगाला ही निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यास सपशेल अपयश आलेलं आहे आणि याला निवडणूक आयोगच नव्हे तर स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा तितकेच जबाबदार आहेत.

Aadesh Bandekar
Uddhav Thackeray News : मुंबईतील 'म' फॅक्टर उद्धव ठाकरेंच्या पथ्यावर पडणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com