Lok Sabha Election 2024 : 'शिर्डीची एक जागा आम्हाला मिळायला हवी होती'; आठवलेंची जाहीर खंत!

Ramdas Athawale News : शिर्डीत 'शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना, असा सामना रंगणार आहे.
Ramdas Athawale
Ramdas Athawalesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभा उमेदवारांची आठ जणांची यादी जाहीर केली. शिर्डीतील विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांनी दोन दिवसांपूर्वी 'आपलं फिक्स आहे' म्हणून सांगितले होते. त्यानुसार शिवसेनेकडून विद्यमान खासदार लोखंडे यांनाच पुन्हा एकदा शिर्डीतून संधी दिली आहे. शिर्डीत 'शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना, असा सामना रंगणार आहे. महायुतीत असलेल्या आरपीआय आठवले गटाचा अर्थात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा पत्ता कट' झाला आहे. यावर आठवलेंनी आता जाहीर खंत व्यक्त केली आहे. (Ramdas Athawale News)

Ramdas Athawale
Kolhapur NCP : 'बडा घर, पोकळ वासा!'; कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या स्थितीला जबाबदार कोण?

आठवले माध्यमांशी संवाध साधताना म्हणाले, "महायुतीत भाजप-शिवसेना-आरपीआयच्या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आल्यामुळे आमची थोडी अडचण झाली आहे. शिर्डीची जागा आरपीआयला लढायची होती. मात्र, आता ही जागा शिवसेनेला गेली आहे. महाराष्ट्रात आम्हाला 45 जागा निवडून आणायच्या आहेत. "

"अजितदादाचं मी आभार व्यक्त करतो, त्यांनी मोठी जोखीम घेऊन आमच्या महायुतीसोबत आले आहेत. शिर्डीवरून आमची थोडीफार नाराजी होती, पण महायुतीचा नारा असल्यामुळे आमची नाराजी दूर झाली आहे. पण आरपीआयला योग्य तो सन्मान मिळावा, आमची अपेक्षा आहे. दिलेला शब्द फडणवीस पाळतील अशी आम्हाला आशा आहे," असेही आठवले म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramdas Athawale
Lok Sabha Election :...तर वेगळा मार्ग धरणार; नाराज रामदास आठवलेंचा महायुतीला इशारा

'फडणवीस हुशार राजकारणी' -

रासपचे नेते महादेव जानकरांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, तुम्हाला किंवा तुमच्या पक्षातील नेत्यांना का डावलले आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर आठवले म्हणाले, "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हुशार राजकारणी आहेत. जानकर हे महाआघाडीत जाऊ नयेत म्हणून आधीच त्यांना महायुतीत घेत परभणीची जागा त्यांना सोडण्यात आली."

शरद पवारांना भेटलो असतो, तर... -

"मी जर कदाचित ज्येष्ठ नेते शरद पवारांना (Sharad Pawar) भेटून आलो असतो तर मला महाविकास आघाडीची एक जागा त्यांनी सोडली असती. पण मी काही तसा प्रयत्न केला नाही. कारण मी प्रामाणिक माणूस आहे. मी ज्यांच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत राहण्याची माझी भूमिका आहे. त्यामुळे असे काही डावपेच काही केले नाहीत," अशा मिश्किली करत आठवलेंनी एकाच वेळी फडणवीस आणि जानकरांना राजकीय चिमटा काढला आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com