Maharashtra Politics : ग्रामीण भागात 'मतपेरणी'साठी भाजपचं नवं 'कौशल्य'...

Mangal Prabhat Lodha : मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारातून भाजपची ग्रामीण भागातील युवकांना साद
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra BJP Politics : सरकारच्या वतीने नव्या वर्षाच्या निमित्ताने 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना नवे 100 कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ग्रामीण भागातील 100 महाविद्यालयांमध्ये संबंधित नवी कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर घेतलेल्या या निर्णयातून महायुती सरकार मतपेरणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील 350 तालुक्यांत 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. या केंद्रांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते दोन महिन्यांपूर्वी ऑनलाईन उद्घाटन केले. यासाठी मंत्री लोढा यांनी पुढाकार घेतला होता. यानंतर पुन्हा लोढांनी ही योजना ग्रामीण भागात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खेड्यातून शहराकडे होणारे स्थलांतर कमी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

BJP
Nagpur Protest : ट्रकचालकांच्या आंदोलनामुळे विदर्भात अफवाच अफवा...

आता महायुती सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी नव्याने 100 कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. नव्या वर्षात ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची भेट देण्यासाठी सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांना साद घाण्यासाठीच ग्रामीण भागात नव्याने 100 कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. (Mangal Prabhat Lodha)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे PMKVY योजना?

कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र असे ब्रीद घेऊन युवकांसाठी राज्यात पहिल्या टप्प्यात 511 केंद्र सुरू केली. यात कृषिपूरक, पारंपरिक व व्यावसायिक कौशल्यांसह विश्वकर्मा योजनांचाही समावेश केला जातो. या केंद्रांच्या माध्यमातून एकावेळेस जास्तीत जास्त दोन जॉबचे प्रशिक्षण देण्यात येते. हे कोर्सेस तीन महिन्यांचेच असतात. (PMKVY Scheme)

राज्यातील प्रत्येक प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून 2023-24 साठी एकूण 100 उमेदवारांचे प्रशिक्षणाचे उद्दिष्ट दिले आहे. यात किमान 30 टक्के महिलांचा समावेश असणे बंधनकारक आहे. यातून दरवर्षी सुमारे 50 हजार युवक-युवती रोजगारक्षम होतील, असा दावा सरकारने केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

BJP
Ameya Khopkar: मनसेनेते अमेय खोपकरांच्या पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया; स्वत:च दिली माहिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com