Uddhav Thackeray : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना धक्का बसण्याची शक्यता, शिंदे गटातील आमदार ठाकरेंच्या संपर्कात?

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरे गटाकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे.
eknath shinde uddhav thackeray
eknath shinde uddhav thackeraysarkarnama

Mumbai News, 7 June : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) महाविकास आघाडीनं महायुतीला '440' चा करंट दिला आहे. जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजुनं कौल देत महायुतीला नाकारल्याचं दिसत आहे. '45' प्लस जागांची वल्गना करणारी महायुती '17' वरच थांबली. तर, महाविकास आघाडीचा ( Mahavikas Aghadi ) दणदणीत म्हणजे '31' जागांवर विजय झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील समीकरण बदलू शकतात. शिंदे गटानं 13 जागा लढल्या होत्या. त्यातील 7 जागांवर विजय मिळवला आहे. तर, ठाकरे गटानं 18 जागा लढविल्या होत्या. त्यामध्ये 9 जागांवर ठाकरे गटाचे खासदार निवडून आले आहेत.

'शिवसेना' नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी 9 खासदार निवडून आणल्यानं महायुतीत खळबळ उडाली आहे. आगामी काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये चल-बिचल सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. शिंदेंच्या शिवसेनेतील 6 ते 7 आमदार शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं समोर येत आहे.

2022 मध्ये पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका करणं टाळलं, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, तटस्थ भूमिका घेतली त्यांना पुन्हा पक्षात घेतले जाण्याची शक्यता आहे. पण, 'गद्दारांना क्षमा नाही,' असं वारंवार उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या ( Uddhav Thackeray ) भुमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

eknath shinde uddhav thackeray
Devendra Fadnavis News: अनपेक्षित निकाल,अपयशाची जबाबदारी,राजीनाम्याची तयारी...; फडणवीसांनी एकाच दगडात किती पक्षी मारले...?

याबाबत ठाकरे गटातील आमदार सचिन अहिर म्हणाले, "6 ते 7 आमदारांचा आकडा कुठून आला माहिती नाही. पण, हा आकडा 10 किंवा 20 ही असू शकतो. निकालानंतर आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थेचं वातावरण निर्माण झालं आहे. याचा पश्चाताप आमदारांना होत असेल. त्यामुळे ती संख्या सहा नाही तर 10 किंवा 20 असू शकते."

"लोकसभा निवडणुकीत अनेक आमदारांनी आणि अपक्ष नेत्यांनी आमचा विचार करावा, अशी गळ घातली होती. आम्ही लोकसभेत मदत करतो, विधानसभेला आमचा विचारा करावा, असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, 'दरवाजे बंद आहेत,' असं आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं," असं अहिर यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com