Jitendra Awhad Vs Eknath Shinde : समझने वालों को इशारा काफी है! मुख्यमंत्री शिंदेंवर जितेंद्र आव्हाड ठरले भारी

Shrikant Shinde Vs Vaishali Darekar : डॉ. श्रीकांत शिंदे यांना अंबरनाथ, कल्याणपूर्व, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागातून मोठं मताधिक्य मिळालं. पण, कळवा-मुंब्रा भागात मात्र त्यात घट झाली आहे.
jitendra awhad | eknath shinde
jitendra awhad | eknath shindesarkaranama

Mumbai News, 6 June : ठाकरेंशी राजकीय बेईमानी केल्यानंतर शिंदेंवर तुटून पडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) नेते जितेंद्र आव्हाड चार पावले पुढे होते. शिवसेनेतील बंडानंतर रोज आव्हाड शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना नको त्या भाषेत नको तसे बोलून मोकळे व्हायचे. फुटीरांना धडा शिकवायचा या न्यायाने आव्हाड पेटले आणि शिंदे पिता-पुत्रांच्या मागे लागले.

लोकसभा निवडणुकीतही आव्हाडांनी शिंदेंना म्हणजे कल्याण-डोबिंवलीचे खासदार श्रीकांत शिंदेंची ( Shrikant Shinde ) कोंडी व्हावी म्हणून त्यांच्याविरोधातील वैशाली दरेकरांना मोठी रसद पुरवली. शिंदेंच्याच कल्याण-डोबिंवलीत आव्हाडांच्या कळबा मुंब्र्यातून वैशाली दरेकरांना 86 हजार मते मिळाली आहेत.

हा आकडा पाहून शिंदेंच्या 'होमपिच'वर पण आव्हाडांची ( Jitendra Awhad ) ताकद असलेल्या कळवा-मुंब्र्यात आव्हाडांचाच बोलबाला राहिला आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत शिंदे पिता-पुत्रांनी आव्हाडांची आमदारकी घालवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी वैशाली दरेकरांना मिळालेल्या मतांचा आकडा आव्हाडांच्या आमदारकीवर शिक्कामोर्तब करणारा आहे. त्यामुळे 'कोणी-कितीबी करा रे हल्ला कळवा मुंब्र्यात आव्हाडांचाच मजबूत किल्ला...' असेच म्हणावे लागेल.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले डॉ. श्रीकांत शिंदे यांना अंबरनाथ, कल्याणपूर्व, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागातून मोठं मताधिक्य मिळालं. पण, कळवा-मुंब्रा भागात मात्र त्यात घट झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा-मुंब्रा भागातून शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) उमेदवार वैशाली दरेकर यांना 86 हजारांचं मताधिक्य मिळालं आहे.

jitendra awhad | eknath shinde
Amit Shah News : महाराष्ट्राच्या राजकारणात अमित शाहांच्या 'ब्ल्यू आइड बॉय'ची एन्ट्री?

कोणाला किती मते मिळाली?

लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना 4 लाख 39 हजार 966 मते पडली आहेत. तर, वैशाली दरेकर यांना 2 लाख 34 हजार 488 मते मिळाली आहेत. 2 लाखांच्या मताधिक्यानं वैशाली दरेकर यांचा पराभव झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com