भाग्यश्री प्रधान आचार्य-
Kalyan Dombivli Politics News :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सहा मतदारसंघात आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात एका बाजूला शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या तिकीटावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचा उबाठा गटाचा उमेदवार ठरला असून येत्या 15 दिवसांनी नाव जाहीर करणार,असे Uddhav Thackeray गटाचे कार्यकर्ते सांगत आहेत, तर सुषमा अंधारे हा चांगला पर्याय असल्याची चर्चा काही जणांमध्ये रंगली आहे. त्यामुळे गुलदस्त्यात असलेले नाव सुषमा अंधारे असेल का? असा अंदाज बांधला जात आहे.
लोकसभा निवडणुका लवकरच येऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या तिकीटावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. यावरून 'उबाठा' गटाचे आमदार आदित्य ठाकरे छोट्या शिंदेंसमोर उभे राहणार का, अशी चर्चा होती. आदित्य ठाकरे यांचे नाव प्रकर्षाने घेतले जात होते. मात्र आमचे आदित्यसाहेब वाघ आहेत. इथे निवडणूक लढवण्यासाठी आमचा वाघ आम्हाला बाहेर काढायचा नाही, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या निवडणुकीसाठी आमचा चेहरा वेगळाच आहे. आम्ही आता नाव सांगणार नाही. पुढील 15 दिवसांनी आम्ही नाव जाहीर करू. पण समोरच्याला तोडीस तोड, असा चेहरा महाविकास आघाडी देणार आणि त्यात एखादी महिलाही असू शकते, अशी माहिती डोंबिवलीच्या शिवसेना शहर शाखेतील कार्यकर्त्यांनी दिली.
edited by sachin fulpagare
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.