Uddhav Thackeray In Kalyan : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा 'गनिमी कावा'; मुख्यमंत्री पुत्र खासदारांचा 'करेक्ट कार्यक्रम..'

Uddhav Thackeray Vs Eknath Shidne : कल्याण लोकसभेसह सहा विधानसभा मतदारसंघावर रणनीती...
Uddhav Thackeray In Kalyan  Eknath Shidne
Uddhav Thackeray In Kalyan Eknath ShidneSarkarnama

भाग्यश्री प्रधान आचार्य -

Kalyan Dombivli News : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या कल्याणमध्ये शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत. एकंदरीतच कल्याण शहरावर वर्चस्व राखण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून सर्वच पक्षांकडून राजकीय अस्तित्वाची लढाई दाखवली जात आहे. त्यामुळे कल्याणला वेगळेच राजकीय वळणं लागत असल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कल्याण-डोंबिवलीत येत आहेत. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray In Kalyan  Eknath Shidne
Kalyan Dombivli News : मुख्यमंत्री शिंदेंनी केलं लेकाचं कौतुक; कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत सूचक विधान

जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता -

पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच येणार असल्यामुळे ठाकरे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ठाकरे कल्याण लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. या साठी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Uddhav Thackeray In Kalyan  Eknath Shidne
कल्याणवर दावा? श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातच भाजपचे मिशन 2024

ज्या माणसाने संघटनेवर घाला घातला -

ज्यांना पाळलं, पोसलं, पाणी पाजलं, अन्न दिले. सर्व काही दिले आणि पण माज चढला. पाठीत खंजीर खुपसून गेले. इतकेच नाही तर या माणसाने संघटनेवर घाला घातला. ही ज्वाला तुमच्या ह्दयात पेटली पाहिजे, असे विधान ठाकरे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख विजय साळवी यांनी केले आहे. येत्या १३ जानेवारीला उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत साळवी यांनी हे विधान केले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com