Vijay Shivtare News : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारे संतापले, म्हणाले, "आता अजित पवारांना माझा अवाका समजेल"

Vijay Shivtare On Ajit Pawar : "अजित पवारांनी सगळ्यांना हैराण करत संपवण्याचा प्रयत्न केला आहे," असा आरोपही शिवतारेंनी केला.
Vijay Shivtare | Ajit Pawar
Vijay Shivtare | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Political News : बारामती लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे अजित पवार आणि विजय शिवतारे पुन्हा समोरा-समोर आले आहेत.

आता शिवतारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, चर्चेनंतर विजय शिवतारे बारामती मतदारसंघातून लढण्यावर ठाम आहेत. तसेच, "अजित पवारांना आता माझा अवाका समजेल," असा घणाघात विजय शिवतारेंनी केला.

Vijay Shivtare | Ajit Pawar
Vijay Shivtare On Ajit Pawar : विजय शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम, अजितदादांवर केली आगपाखड

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवतारे ( Vijay Shivtare ) म्हणाले, "अजित पवारांना विरोध करण्याची कुणाचीही हिंमत नाही. सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकत मोडण्याची जनतेची इच्छा आहे. त्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून उभे राहणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंना सांगितलं."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"लोकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय कळवू"

"मी बारामतीतून लढलो नाही, तरी अजित पवार (Ajit Pawar) निवडून येणार नाहीत. महायुती त्या जागेवर पराभूत होणार आहे. पण, युती धर्म पाळायला हवा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. लोकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय कळवू, असं सांगितलं," अशी माहिती शिवतारेंनी दिली.

"पैसे अजित पवारांच्या घरातील आहेत का?"

"अजित पवारांनी सगळ्यांना हैराण करत संपवण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांनी 'डीपीडीसी'च्या माध्यमातून पुरंदरमधील एका व्यक्तीला 25 कोटींचा निधी दिला आहे. हे पैसे अजित पवारांच्या घरातील आहेत का? तो व्यक्ती 'डीपीडीसी' सदस्य, आमदार, खासदार, माजी मंत्रीसुद्धा नाही. निव्वळ निवडणूक असल्यानं निधी दिला गेला," असा आरोप शिवतारेंनी केला आहे.

Vijay Shivtare | Ajit Pawar
Vijay Shivtare On Ajit Pawar : "देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामती जिंकणार नाहीत," शिवतारेंची दर्पोक्ती

"राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी दंड थोपटले"

"आता अजित पवारांना माझा अवाका माहिती पडेल. मी छोटा माणूस आहे, मग अजित पवार मला का घाबरत आहेत, मग आता एवढं का तडफडत आहेत. मी राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी दंड थोपटले आहेत," असंही शिवतारेंनी म्हटलं.

"पाणी योजनेसाठी पवारांनी निधी दिला नाही"

"राज्य आणि केंद्र सरकारचे प्रकल्प बारामतीत. तेथील एसटी स्टँडसाठी 60 कोटी रुपये अजित पवारांनी दिले. पण, देवाची उरळी आणि फुरसुंगीच्या पाणी योजनेसाठी 25 कोटी रुपयांचा निधी अजित पवारांनी दिला नाही," अशी टीका शिवतारेंनी केली.

R

Vijay Shivtare | Ajit Pawar
Vijay Shivtare Vs Ajit Pawar : अजितदादांना थेट नडणाऱ्या शिवतारेंना मुख्यमंत्री शिदेंनी तब्बल सहा तास ताटकळवलं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com