Mahayuti Vs MVA: देवेंद्र फडणवीस डोकं खाजवणार ? मिशन 45 फसणार

lok sabha election 2024 exit polls BJP and Devendra Fadanavis Dream may be failed :एक्झिट पोलच्या आकडेनुसार महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार असल्याचे दिसते. महाविकास आघाडीला राज्यात 23 ते 25 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Mahayuti Vs MVA
Mahayuti Vs MVASarkarnama
Published on
Updated on

lok sabha election 2024 exit polls:शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा एक-दोन नव्हे तर, ४०-५० आमदार फोडून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ३०-३५ आमदार आपल्याकडे खेचून राज्याच्या राजकारणात 'सबसे बडा खिलाडी' ठरू पाहणाऱ्या भाजपला जमिनीवर आणले जाऊ शकते. या निवडणुकीत ठाकरेंचे किमान १० उमेदवार निवडून येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दुसरीकडे, पवारसाहेबांना चहूबाजुंनी घेरूनही त्यांचे 6 उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. मात्र, फोडाफोडी करून न भागलेल्या आणि शेवटी ठाकरेंच्या भीतीपोटी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना साथीला घेऊनही भाजपला निम्म्याही जागा मिळण्याची चिन्हे नाहीत. अर्थात, २८ पैकी १७ उमेदवार जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे निकालानंतर भाजपला नेत्यांना विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर डोकं खाजविण्याची वेळ ओढावण्याची भीती 'एक्झिट पोल'ने दाखवली आहे. 'एबीपी आणि सी-व्होटर'ने भाजपची सत्तापालट होण्याची बाब अधोरेखित केली आहे.

महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 प्लसचं स्वप्न भंगणार असल्याचे पोलच्या आकडेवारीवरून दिसते. सी-व्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागा मिळतील. एबीपी माझा आणि सी व्होटरने हा सर्वात मोठा ओपिनियन पोल केला. त्यानुसार प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्यात महायुतीचं मिशन ४५ चं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता नसलयाचे स्पष्ट होत आहे.

Mahayuti Vs MVA
Exit Polls 2024 : सांगलीत ठाकरे अन् फडणवीसांना धक्का! 'पायलट' विशाल पाटलांचं विमान दिल्लीला सेफ लॅण्ड करणार?

राज्यात भाजपला 17, शिंदे गट 5 आणि अजित पवारांना 1 जागा मिळतील असं या सर्व्हेत दिसतंय. काँग्रेसला 8, तर ठाकरे 9 आणि पवारांना 6 जागा मिळतील असं ओपिनियन पोलमध्ये दिसतंय.

एक्झिट पोलच्या आकडेनुसार महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार असल्याचे दिसते. महाविकास आघाडीला राज्यात 23 ते 25 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महायुतीला 24 ते 26 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. दोन्ही गटांना फिफ्टी-फिफ्टी संधी असल्याचं दिसतंय. आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com