Shambhuraj Desai News : 'ठाण्याचा पालकमंत्री असलो तरी उमेदवार ठरवण्याचे काम मात्र...'; मंत्री शंभूराज देसाईंचं मोठं विधान

Loksabha Electiion 2024 : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी केलेले कामे जनतेसमोर न्यायचे आहे.
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSarkarnama

Thane News : व्यासपीठावरून भाषण करताना, उध्दव ठाकरे आता तमाम हिंदू माता बांधवांनो... हे देखील बोलायला विसरतात अशी टीका ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. याचवेळी त्यांनी ठाणे लोकसभेचा उमेदवार ⁠कोण असेल यापेक्षा मोदींना ४०० पार जागा निवडून द्यायच्या आहेत यावर आमचे लक्ष असल्याचेही त्यांनी मत व्यक्त केले.

महायुतीचा मेळावा ठाण्यात बुधवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देसाई यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी ठाण्यात महायुतीचा हा पहिलाच मेळावा असल्याने खूप महत्वाचा आहे. ठाणे लोकसभेची कोणाला उमेदवारी दिली गेली, याबाबत मला काही माहिती नाही. मात्र, सन्मानजनक उमेदवार ठाण्यात दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Shambhuraj Desai
Rohit Pawar Vs Sujay Vikhe : 'जास्त अहंकार दाखवू नका, नाहीतर...' रोहित पवारांचं सुजय विखेंना उद्देशून विधान!

ठाणे शहरात पार पडलेल्या पहिल्या महायुतीच्या मेळाव्यात आमदार निरंजन डावखरे, भाजप पदाधिकारी माधवी नाईक, माजी महापौर नरेश म्हस्के आदींसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी 'आमचा उमेदवार नरेंद्र मोदी' असा नारा देत, तो उमेदवार कोण याचा विचार न करता केवळ महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचं असा निर्धार यावेळी करण्यात आला.

ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचा पहिला मेळावा बुधवारी ठाण्यातील टीप टॉप प्लाझा मध्ये पार पडला. या मेळाव्याला शिवसेना प्रवक्ते तथा माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माधवी नाईक, राष्ट्रवादीचे प्रवत्ते आनंद परांजपे, नजीब मुल्ला, प्रभाकर सावंत आदीसह रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ठाण्याचा पालकमंत्री असलो तरी उमेदवार ठरवण्याचे काम महायुतीतील वरीष्ठांचे असल्याचेही ते म्हणाले. जागा बदलाबाबत त्यांना छेडले असता त्यांनी यावेळी मला त्याविषयी काही माहिती नाही असेही त्यांनी सांगितले.

महायुतीला या निवडणुकीत 45 पेक्षा जास्त जागा मिळतील असेही ते म्हणाले. आघाडी कोणाची आहे, समोर कोण आहे यापेक्षा मोदी यांच्यासाठी काम करायचे आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी केलेले काम जनतेसमोर न्यायचे आहे असेही ते म्हणाले.

शिंदे हे राज्याचे नेतृत्व करत असले तरी त्यांचे ठाण्याकडे बारीक लक्ष असल्याचेही ते म्हणाले. अडीच वर्षात सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक राज्यात आणली गेली आहे. आम्ही सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी उठाव केला त्याला आम्ही पाठिंबा दिला असेही ते म्हणाले,

तर आमची मने आणि मतेही जुळलेली असून लवकरच महायुतीच्या ठाणे, कल्याण, पालघर येथील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. याशिवाय जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपमध्ये(BJP) कुठेही बंडखोरी झाली असे म्हणता येणार नाही. मात्र पाटील यांनी असा निर्णय घ्यायला नको होता," असेही भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Shambhuraj Desai
Sanjay Nirupam Suspension: मोठी बातमी! काँग्रेस पक्षाचा संजय निरुपम यांना दणका, सहा वर्षांसाठी निलंबन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com