Naseem Khan News : राहुल गांधीच्या भेटीनंतर काँग्रेसच्या नसीम खान यांचा राग मावळला

Rahul Gandhi : वर्षा गायकवाड यांच्या प्रचारात नसीम खान सक्रिय होणार आहेत. उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढण्यासाठी नसीम खान इच्छुक होते. मात्र, राहुल गांधींच्या सभेमध्ये त्यांची नाराजी दूर करण्यात आली.
Naseem Khan Rahul gandhi
Naseem Khan Rahul gandhisarkarnama

Loksabha Election : मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते नसीम खान यांनी एकाही मतदारसंघात मुस्लिम उमेदवार दिला गेला नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच स्टार प्रचारकांच्या यादीतून राजीनामा दिला. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात होते. मात्र, अखेर नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला Congress यश आले आहे.

Naseem Khan Rahul gandhi
Congress Vs BJP : भाजपचे 'अच्छे दिन' फक्त टीव्हीवरच, लातूरला चांगले दिवस आमच्यामुळे; देशमुखांनी डागली तोफ

शुक्रवारी (ता.3) राहुल गांधी Rahul Gandhi यांची पुण्यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सभा होती. या प्रचार सभेला नसीम खान हे देखील उपस्थित होते. राहुल गांधी यांच्याशी नसीम खान यांची चर्चा केल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली. नसीम खान यांच्या राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी चर्चा करत त्यांची समजूत काढली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वर्षा गायकवाड यांच्या प्रचारात नसीम खान सक्रिय होणार आहेत. उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढण्यासाठी नसीम खान इच्छुक होते. मात्र, राहुल गांधींच्या सभेमध्ये त्यांची नाराजी दूर करण्यात आली. सभेत त्यांनी भाषणही केले. नसीम खान यांची नाराजी दूर झाल्याने वर्षा गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काय म्हणाले होते नसीम खान?

काँग्रेसच्या प्रचार समितीमधून राजीनामा देताना आपण निवडणुकीत एकाही उमदेवाराचा प्रचार करणार नाही. काँग्रेसने अल्पसंख्यांक समाजातील एकाही उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आपण दुखावलो असल्याचे नसीम खान यांनी म्हटले होते.

Naseem Khan Rahul gandhi
Congress Vs BJP : भाजपचे 'अच्छे दिन' फक्त टीव्हीवरच, लातूरला चांगले दिवस आमच्यामुळे; देशमुखांनी डागली तोफ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com