Mayor Reservation : महापौर आरक्षण सोडत 22 जानेवारीला; शिंदेकडील खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार संपूर्ण प्रक्रिया

Mayor post reservation lottery : काही महापालिकांमध्ये महापौरपदासाठी नगरसेवकांचे आवश्यक संख्याबळ कोणत्याही एका पक्षाकडे नाही.
BMC mayor Race
BMC mayor RaceSarkarnama
Published on
Updated on

Mayor post reservation lottery : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची धामधूम संपल्यानंतर आता महापौरपदाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तब्बल २५ महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर असणार, हे जवळपास निश्चित आहे. मात्र अद्याप महापौरपदाच्या आरक्षणाची सोडतच न निघाल्याने कोंडी निर्माण झाली आहे. आता ही सोडत कधी निघणार, याची प्रतिक्षा संपली आहे.

राज्याच्या नगरविकास खात्याकडून आरक्षणाची सोडत काढली जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या खात्याचे मंत्री आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंच्या ग्रीन सिग्नलनंतर विभागाने आरक्षणाची सोडत काढण्यासाठी दिवस निश्चित केल्याचे समजते. त्याबाबतचे एक पत्र सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.

शासनाचे उपसचिव अनिरुध्द जेवळीकर यांचे १९ जानेवार रोजीचे नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांना हे पत्र लिहिलेले आहे. त्यानुसार २२ जानेवारीला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी ११ वाजल्यापासून सोडत प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पत्रामध्ये तारीख आणि वेळ स्पष्ट करण्यात आल्याने महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरूवारच निघणार, यावर या पत्रानुसार शिक्कामोर्तब झाले आहे. अद्याप अधिकृत कुणीही याबाबत माहिती दिलेली नाही. दरम्यान, आरक्षणाची सोडत जाहीर झाली नसली तरी राजकीय पक्षांकडून त्यासाठीची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे.

काही महापालिकांमध्ये महापौरपदासाठी नगरसेवकांचे आवश्यक संख्याबळ कोणत्याही एका पक्षाकडे नाही. त्यासाठी मित्रपक्ष आणि विरोधी पक्षांतील नगरसेवकांना गळ घालण्याचे रणनीती आखली जात असून तसे प्रयत्नही सुरू झाले आहेत. आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर या घडामोडींना अधिक वेग येईल. महापौरपदी नेमके कोण विराजमान होणार, यासाठीही लॉबिंग सुरू होईल. त्यामुळे निवडणुका पार पडल्या असल्या तरी महापौरपदासाठी अजूनही राजकीय वातावरण तापलेलेच असणार आहे.  

मुख्यमंत्री दावोसमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये आहेत. काल पहाटे ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागासाठी तिथे दाखल झाले आहेत. फडणवीस पाच दिवस तिथेच असतील. त्यामुळे आरक्षणाची सोडत लांबणार असल्याचीही चर्चा आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com