मुंबई : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला. यावेळी सत्ताधारी-विरोधका आमने-सामने आणि राडा झाला. या राड्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. या आंदोलनाबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्याकडे तक्रार केली आहे.
सत्ताधारी आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना विरोधकांनीही आदोलनाला सुरूवात केली. त्यावेळी शिवीगाळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. मिटकरी माध्यमांशी बोलत होते.
मिटकरी म्हणाले, "आम्ही संस्कृती जपणारी, पवार साहेबांच्या विचारांवर चालणारी माणसे आहोत. या घटनेनंतर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला शिवीगाळ करणाऱ्यांना समज द्या. आम्ही विरोधी पक्ष आहोत, आम्ही जाब विचारणारच,"
"कोणीतरी शिंदे गटातल्या शिंदे नावाच्या आमदाराने तिथे धक्काबुक्की केली, आम्हाला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली. आमची 50 खोके एकदम ओक्के घोषणा त्यांच्या जिव्हारी लागली. आमचे आंदोलन शांततेत सुरू होते. हे राज्याला न शोभणारे आहे. शिंदे गटातल्या शिंदे नावाच्या आमदाराने धक्काबुक्की केली, पत्रकारांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर अजितदादांनी समजावून सांगितले आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नेले," असे मिटकरी यांनी सांगितले.
"अधिवेशनाचे राहिलेले दोन दिवस अरेरावीत घालवायचे, हेच त्यांचे नियोजन होते. जशासतसे उत्तर देण्याची त्यांची भाषा होती. भरत गोगावले यांनाही आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काही आमदारांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही शांततेने उत्तर दिले. आंदोलन करण्याचा सत्ताधाऱ्यांना अधिकार असेल, मात्र विरोधकांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. 50 खोके एकदम ओक्के ही आमची घोषणा त्यांच्या जिव्हारी लागली," असे मिटकरी यावेळी म्हणाले.
मिटकरी म्हणाले, "काल महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली की शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाच आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाची मागणी करायची. म्हणून आम्ही 10:30 वाजता पायऱ्यांवर जमायचे ठरवले होते. मात्र, सत्ताधारी आमच्या आधी तिथे पोचले आणि आंदोलन करायला सुरुवात केली,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.