Manoj Tiwari : ठाण्यातील सभेत अभिनेता मनोज तिवारी यांची तुफान फटकेबाजी

Manoj Tiwari MLA Sanjay Kelkar Thane City Constituency : मनोज तिवारी यांनी ठाणे शहर विधानसभा शहर मतदारसंघातील आमदार संजय केळकर यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले.
Manoj Tiwari
Manoj TiwariSarkarnama
Published on
Updated on

Thane News : अभिनेता तथा गायक मनोज तिवारी यांनी ठाणे इथल्या सभेत तुफान फटकेबाजी केली.

'महाराष्ट्राच्या विकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डबल इंजिनची भेट द्याची आहे', असे मनोज तिवारी यांनी म्हटले. मनोज तिवारी ठाणे विधानसभा शहर मतदारसंघात आमदार संजय केळकर यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.

मनोज तिवारी म्हणाले, "आम्ही सिनेमा करतो, गाणी गातो, लोकांचे मनोरंजन करतो; मात्र आज आमचा सगळ्यात मोठा उद्देश आहे, की गरिबांना चांगले दिवस यावेत, मोदी (Narendra Modi) सरकारने काही समस्या सोडवल्या आहेत, काही सोडवायच्या आहेत. त्यासाठी आपल्या सर्वांना एकजूट होऊन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणायचे आहे. मोदींना डबल इंजिनची भेट द्यायची आहे".

Manoj Tiwari
Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; ‘मी शर्यतीत...’

'ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा माणूस आहे. इतर आमदारांनी पीए ठेवले आहेत; परंतु केळकर हे जनसेवक आहेत, ते थेट सर्वांना भेटतात. मतदानासाठी (Voter) मोठ्या संख्येने बाहेर पडा', असे आवाहनही मनोज तिवारी यांनी केले.

Manoj Tiwari
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी 'गोल्डन गॅंग'च्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम केला?

'महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींसाठीची दिली जाणारी रक्कम ही 2100 रुपये केली जाणार आहे, सरकार आल्यावर भ्रष्टाचार समूळ नष्ट केला जाईल. आशासेविकांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. भाजपवाले जे बोलतात ते करतात, हे यापूर्वीच्या निर्णयांवरूनदेखील दिसले आहे. त्यामुळे तुम्हालाही आता विश्वास दाखवून महायुतीला निवडून द्यायचे आहे', असे आवाहनही केले.

सहा ठिकाणी चौकसभा

गावदेवी मैदान, साडेसात वाजता अशोक टॉकीज, साडेआठ वाजता खारटण सिडको बस टॉप, खोपट, रुणवाल नगर, उथळसर नाका येथे या सभा घेतल्या गेल्या. यावेळी ठाणे भाजपचे उपाध्यक्ष विक्रम भोईर, दिशा प्रवीण रानडे, सह्याद्री प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी संबोधित केले.

ब्राह्मण समाजाचा पाठिंबा

संजय केळकर यांना विधानसभा निवडणुकीत तेली समाजासह नामदेव शिंपी समाजाने त्यांना पाठिंबा दिला आहे. तर, राज्याचे सध्याचे सामाजिक व राजकीय वातावरण पाहता हिंदुत्वाचा मुद्दा भाजप आणि मित्रपक्ष यांनी केंद्रस्थानी ठेवला आहे. ब्राह्मण समाजाचीदेखील हीच भूमिका असल्यामुळे हा पाठिंबा दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com