Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी 'गोल्डन गॅंग'च्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम केला?

Chandwad Assembly constituency: `नाफेड`च्या कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराची दुर्गंधी चांदवडच्या "कोणत्या" उमेदवाराला भोवळ आणणार याची होतेय चर्चा
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan Sabha Election: चांदवड कांदा उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नावरील राजकारणासाठी केंद्रबिंदू आहे. लोकसभा निवडणुकीत या `चांदवड`ने भाजपचा कार्यक्रम केला. आता विधानसभेतही खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका विधानाने त्याच पक्षाशी संबंधित अपक्ष उमेदवाराची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची काल चांदवड येथे जाहीर सभा झाली. काँग्रेसचे उमेदवार शिरीष कोतवाल यांच्या प्रचारासाठी ही सभा होती. या सभेत खासदार सुळे यांनी उपस्थितांशी थेट संवाद केल्याने सभेला प्रतिसाद मिळाला.

Supriya Sule
Sanjay Raut Politics: संजय राऊत कोणाला म्हणाले, "त्या टपरी आमदाराला पाडा"

सभा सुरू असतानाच उपस्थितांमधून अनेक सूचना केल्या जात होत्या. अनेक जण चिठ्ठ्या लिहून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देत होते. त्यातच एक चिठ्ठी आली आणि सभेचा नूरच पालटला. या चिठ्ठीमध्ये कांदा आयात बंदी केल्यानंतर `नाफेड`ने कांदा खरेदी केली. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही खरेदी झाली. या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. हा भ्रष्टाचार `गोल्डन गँग` ने केला, असे लिहिले होते.

Supriya Sule
Rahul Gandhi Politics: बालेकिल्ल्यात राहुल गांधी गरजले, मोदींना आव्हान देत आदिवासींना जिंकले!

खासदार सुळे यांनी ही चिठ्ठी वाचून आश्चर्य व्यक्त केले. ही चिठ्ठी मी राज्यभर विविध सभांमध्ये दाखवणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांतून कांदा खरेदीतील भ्रष्टाचारांतील काही नावे उच्चारण्यात आली. त्यामुळे खासदार सुळे यांनी उपस्थितांना त्या सगळ्यांवर कारवाई होईल, असे ठोस आश्वासन दिले.

खासदार सुळे एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी या प्रश्नावर संसदेत आवाज उठवणार. खासदार भास्करराव भगरे आणि मी स्वतः हा प्रश्न तडीस लावणार. प्रसंगी त्यासाठी चांदवडमध्ये येऊन उपोषण देखील करणार, अशी घोषणा त्यांनी केली. माजी आमदार शिरीष कोतवाल आता हमखास निवडून येणार आहेत. त्यांनी सर्वप्रथम हा विषय हाती घ्यावा आणि तो तडीस न्यावा, असे त्यांनी सांगितले.

कांदा खरेदीत भ्रष्टाचार करणाऱ्यांना धडा शिकवावा अशी सूचना त्यांनी व्यासपीठावरील माजी आमदार कोतवाल यांना केली. या सभेनंतर नाफेडच्या कांदा खरेदीतील `गोल्डन गॅंग` कोण? अशी चर्चा सुरू झाली. कांदा खरेदीत ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी भाग घेतला, त्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या होत्या. यातील सध्या चांदवड मध्ये अपक्ष उमेदवार असलेल्या भाजपच्या बंडखोर नेत्याकडे अंगुली निर्देश केला जातो.

या उमेदवाराने जवळपास दहा लाख टन कांदा खरेदी केल्याचे बोलले जाते. त्यात त्यांनी स्वतःचे चांगलेच उखळ पांढरे केल्याचे बोलले जाते. हाच भ्रष्टाचाराचा पैसा सध्या चांदवडच्या विधानसभा निवडणुकीत ओतला जात आहे. खासदार सुळे यांनी या विषयावर रस घेतला. थेट आंदोलनाचा इशारा दिला. या प्रश्नावर चर्चा घडवली. त्यामुळे `गोल्डन गॅंग`शी संबंधित उमेदवाराच्या अडचणीत वाढ होणार, हे मात्र नक्की. त्याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होतो, हा देखील चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com