
Mumbai News : लोकसभेला कमबॅक करणारे काँग्रेस महाविकास आघाडीला महायुतीने विधानसभा निडवणुकीत पुरती भुईसपाट करून ठेवली.
राज्यात सर्वाधिक 13 खासदार असलेल्या काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीत 21 जिल्ह्यात एकही आमदार निवडून आलेला नाही. काँग्रेसचे राज्यात फक्त 16 आमदार निवडून आले असून, हा आतापर्यंतची सर्वात नीचांकी कामगिरी आहे.
महायुतीच्या विजयरथाने महाविकास आघाडीला यावेळी पुरतं हादरून सोडलं आहे. राज्यात काँग्रेसची दमदार कामगिरी होईल, असे वाटत असतानाच, फक्त 16 आमदार निवडून आले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचा देखील निसटता विजय झाला आहे.
राज्यात 1970, 1980 च्या काळात विधानसभेत काँग्रेसचे (Congress) 200 पेक्षा अधिक आमदार होते. निवडून देखील यायचे. काँग्रेसची घट्ट पकड होती. पण काँग्रेसची गेल्या दहा ते 15 वर्षांपासून महाराष्ट्रावरील पकड कमी झाली. ताकद कमी झाली आहे. नेतृत्वाचा अभाव किंवा असलेल्या नेतृत्वांमध्ये कुरघोड्यांचे राजकारणाचा हा परिणाम असेल. यातून काँग्रेस सहा महिन्यापूर्वीच्या लोकसभेत सावरेल, असे चित्र निर्माण झालेले असतानाच, विधानसभा निवडणुकीत नीचांकी आमदार निवडणूक आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राजकीय वाटचालीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नांदेड, गोंदिया, वर्धा, परभणी, छत्रपती संभाजीनगर, पुणे, बीड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली, पालघर, रायगड, बीड, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या 21 जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. पुणे, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे हमखास आमदार निवडून येतात. परंतु यावेळी तिन्ही जिल्ह्यात एकही आमदार निवडून आला नाही. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे माजी नेते, माजी मुख्यमंत्री आताचे भाजपचे अशोक चव्हाण यांनी यावेळी काँग्रेसला चांगलेच खिंडीत गाठले. त्यांच्या पक्षांतरानंतर काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसला.
राज्यात काँग्रेसचा असा पराभव का झाला, याची चर्चा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू आहे. बैठकांचे सत्र सुरू आहे. या कामगिरीवर चिंतन केले जात आहे. काँग्रेसची पुढची वाटचाल कशी असेल, यावर मंथन होऊन राज्यात नव्याने रणनीती आखली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीकडून या अपयशाचे सामूहिक जबाबदारी घेतली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.