Vinod Tawde : दोन डायऱ्या, 15 कोटींच्या वाटपाची नोंद अन् माफी; विनोद तावडे बसलेल्या हॉटेलमध्ये काय घडलं?

Vinod Tawde accused of distributing money: हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तावडेंच्या डायऱ्या आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
Vinod Tawde
Vinod TawdeSarkarnama
Published on
Updated on

Nala Sopara News : विरारमधील एका हॉटेलमध्ये मागील तीन तासांपासून मोठा राजा सुरू आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस यांच्यावर पैसे वाटपाचे आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला आहे. आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी 15 कोटीं रुपयांच्या वाटपाचा आरोप केला असून याची नोंद असल्याचा डायऱ्या सापडल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

विनोद तावडे पैसे घेऊन येणार असल्याची माहिती आधीच आपल्याला होती, असा दावा करताना हितेंद्र ठाकूर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, मला तावडेंचे 25 फोन केले, मला जाऊ द्या, माफ करा, असे ते म्हणत होते. कारवाई केली तर आम्ही जाऊ देऊ. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी, अशी मागणी ठाकूरांनी केली.

Vinod Tawde
Vinod Tawde : विनोद तावडेंकडून पैशांचे वाटप? विरारमध्ये राडा, 'बविआ'कडून गंभीर आरोप

विनोद तावडे पाच कोटी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. रात्रीपासूनच वाटप सुरू आहे. माझ्याकडे डायऱ्या आहेत. वसई रोड 5, वसई पश्चिम 4... त्याखाली टोटल आहे 15, असे लिहिले आहे. कुठे किती वाटप करायचं हे सगळं डायरीत लिहिले असल्याचा दावा ठाकूरांनी केला आहे.

आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेराव घातला आहे. ठाकूर यांच्याकडून डायरीतील नोंदींवरून तावडेंना जाब विचाराला जात असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. तसेच कार्यकर्त्यांकडून पाकिटातील पैसे काढून ते दाखवलि जात असल्याचे व्हिडिओही आहेत. हितेंद्र ठाकूरही काही वेळाने हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

Vinod Tawde
Kolhapur Politics: पाटलांची भावनिक साद की नरकेंचा विकास; करवीरच्या जनतेला काय भावणार?

हितेंद्र ठाकुरांकडून पोलिसांशी चर्चा केली जात असून कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून तावडेंची गाडी तपासल्याचे समजते. मात्र, आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला गाडी तपासायला द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे अजूनही तावडे हॉटेलमध्येच असून त्यांना आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून बाहेर जाऊ दिले जात नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com