Mumbai : विधानसभा निवडणुकीत अधिकृत उमेदवारांविरोधात झालेली बंडखोरी थोपवण्यासाठी महाविकास आघाडीकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरी जात रणनीती आखल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘सिल्व्हर ओक’मधून पवार आणि ठाकरेंनी बंडखोरांना फोन केल्याचे समोर आले आहे. तसेच माघार न घेतल्यास त्यांच्या नाईलाजाने कारवाई करावी लागेल, असा इशाराही ठाकरेंनी दिला आहे. अर्ज मागे घेण्यासाठी अवघी काही मिनिटे बाकी असताना शरद पवार आणि ठाकेरंनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
मैत्रीपूर्ण लढतीच्या रस्त्याने जाण्याची आमची इच्छा नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. तर ठाकरे म्हणाले, आम्ही काल-परवा पासून सूचना देत आहोत. अर्ज मागे घेतले नसतील तर पक्ष त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करेल. ज्यांचे-ज्यांचे बंडखोर उमेदवार आहेत, त्यांना आमच्या सुचना गेल्या आहे. तिथे काय होईल, हे तीननंतर स्पष्ट होईल.
शेतकरी कामगार पक्षासोबत काल आमची चर्चा झाली. आम्ही उरणची जागा लढत आहोत. अलीबाग, पेण आणि पनवेल याठिकाणी शेकापचे उमेदवार लढतील. आणखी काही ठिकाणी आम्ही सुचना देत आहोत. तीन वाजल्यानंतर सगळे चित्र जगासमोर येईल, असे ठाकरेंनी सांगितले. (Mahavikas Aghadi)
संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीतील दोन्ही वरिष्ठ नेत्यांची अशी इच्छा आहे की, तिघांनी एकत्रितपणे निवडणूक लढावी. मित्रपक्षांना जागा दिल्या आहेत. तरी काही मित्रपक्षांनी काही मतदारसंघात अर्ज केले आहेत. शरद पवार आणि उध्दव ठाकरेंनी इथून काहींना फोन करून अर्ज मागे घेण्यास सांगितले. कुणीही एकमेकांविरोधात न लढता एकत्रितपणे काम करावे, अशी आमची भूमिका आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.