फडणवीसांच्या 'पेन ड्राइव्ह बॉम्ब'ला गृहमंत्री आज काय उत्तर देणार?

. सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनही विधीमंडळात विरोधकांच्या आरोपांना कसं उत्तर देतं याकडेही लक्ष लागले आहे.
Devendra Fadnavis News | Dilip Walse Patil News | Pen drive bomb News | Maharashtra assembly session 2022
Devendra Fadnavis News | Dilip Walse Patil News | Pen drive bomb News | Maharashtra assembly session 2022 sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत (Maharashtra assembly session 2022) टाकलेल्या 'पेन ड्राइव्ह बॉम्ब'ला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)आज काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे.

फडणवीस (Devendra Fadnavis)यांची मुंबई पोलिसांनी केलेली चौकशी, नवाब मलिक यांचा राजीनामा आदी मुद्यांवर विरोधक आक्रमक होणार आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनही विधीमंडळात विरोधकांच्या आरोपांना कसं उत्तर देतं याकडेही लक्ष लागले आहे. (Dilip Walse Patil News)

सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयातील व्हिडिओ क्लिपमध्ये विरोधकांना संपविण्याचा डाव महाविकास आघाडी सरकार आखत असल्याचा आरोप करत फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी विधानसभेत त्याचे पुरावे सादर केले आहेत.

याप्रकरणावर आज गृहमंत्री वळसे पाटील उत्तर देणार आहेत. गृहमंत्री मागील आठवड्याच्या गुरुवारी सभागृहात निवदेन सादर करणार होते. मात्र, विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार, त्यांनी हे निवेदन पुढे ढकलले. त्यानंतर आज गृहमंत्री सभागृहात उत्तर देण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारी वकिलांवर आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. आपल्या आरोपांच्या पुष्टीसाठी त्यांनी 125 तासांची व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला होता. फडणवीस यांच्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकार काहीसं बॅकफूट गेलं असल्याचे चित्र होते.

गृह खात्यात पोलिसांच्या ट्रान्स्फरसाठी कसे आर्थिक व्यवहार झाले याचे ऑडिओ क्लिप फडणवीस यांनी दिल्यानंतर हे ऑडिओ क्लिप कुठून आली याची माहिती घेण्यासाठी फडणवीस यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली होती यावर ही आज विरोधक अधिवेशनात आक्रमक होणार आहेत.

फडणवीस यांना मुंबईतील BKC पोलिसांनी हजर राहण्यासाठी ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट नुसार नोटीस बजावली होती. पण पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात न बोलविता त्यांच्या बंगल्यावर त्यांची चैाकशी केली.

Devendra Fadnavis News | Dilip Walse Patil News | Pen drive bomb News | Maharashtra assembly session 2022
पंजाबप्रमाणेच नेत्यांची सुरक्षा काढण्याचा विचार करा ; पवारांची गृहमंत्र्यांना सूचना

चैाकशीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, ''राज्य सरकारने पोलीस बदल्याचा महाघोटाळा केला, मी तो बाहेर काढला नसता तर कोट्यावधीचा हा घोटाळा दाबला गेला असता. बदल्यांचा हा अहवाल ठाकरे सरकारने सहा महिने दाबून ठेवला. मला आरोपी बनविता येईल अशा स्वरुपाचे प्रश्न आज मला विचारण्यात आले. न्यायालयाने मान्य केलेला हा घोटाळा आहे. मी जबाबदार नेत्यासारखा वागलो, मला सहआरोपी बनविता येईल का, असे प्रश्न पोलिसांनी मला विचारले. गोपनीय कायद्याचे उल्लघंन केल्यासारखे प्रश्न मला विचारण्यात आले,''

''मला कितीही गोवण्याचा प्रयन केला तरी मी थांबणार नाही मी घोटाळे बाहेर काढणारच, सरकारला यातून काही हाती लागणार नाही. त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत,'' असे फडणवीस म्हणाले. ''ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, त्याला नक्कीच व असे वाटेल की अशी नोटीस देणे योग्य नाही,'' असे ते म्हणाले.

Devendra Fadnavis News | Dilip Walse Patil News | Pen drive bomb News | Maharashtra assembly session 2022
मला साक्षीदार नाहीतर सहआरोपी बनविण्याचा प्रयत्न ; घोटाळे बाहेर काढणारच!

देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांचं पथक दाखल झालं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर पोलिसांनी जबाब नोंदवला. डीसीपी हेमराजसिंह राजपूत आणि एसीपी नितीन जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यात आला. मुंबई सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. तब्बल दोन तास त्यांची चैाकशी झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरा बाहेर गर्दी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com