Maharashtra Assembly : 'खोके सरकार आले.. लोकांचे बजेट मोडले..' ; चूल रचत विरोधकांचे अनोखे आंदोलन !

Mahavikas Aghadi : आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध...
Maharashtra Assembly :
Maharashtra Assembly : Sarkarn

Maharashtra Budget Session : राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. अधिवेशन काळात राज्यातील अनेक मुद्दे उपस्थित झाले. जुनी पेंशन योजनेच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा विधानभवनावर धडकण्याची चिन्हे आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना, विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा देत, प्रतीकात्मक आंदोलन केले.

Maharashtra Assembly :
Lokayukta Bill : लोकायुक्त विधेयक आज विधान परिषेदेच्या पटलावर ; मंजूर होणार की...

'या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय़', 'खावटी अनुदान न देणार्‍या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो..' 'खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले..' 'बजेटमध्ये भोपळा देणार्‍या सरकारचा धिक्कार असो..' 'महागाई वाढवणार्‍या सरकारचा धिक्कार असो..' अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार निदर्शने केली.

Maharashtra Assembly :
Supreme Court : सिब्बलांच्या युक्तीवादाचा भावनिक शेवट; न्यायालयाकडे केली 'ही' महत्त्वाची मागणी

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा बारावा दिवस असून, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर चूल रचत. त्याच्यावर प्रतीकात्मक सिलेंडर ठेवून, गॅस दरवाढ आणि महागाईचा निषेध केला." य़ावेळी आमदार रोहीत पवार, आमदार सुनिल शेळके, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार चेतन तुपे, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com