Mangalprabhat Lodha : सद्या महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्याचे महिला व बालकल्याण विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लव्ह जिहादबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. राज्यात तब्बल १ लाखांपेक्षा अधिक प्रकरणांची नोंद झाली असल्याची माहिती लोढा यांनी दिली आहे. यामुळे विधानसभेत घमासान दिसून आले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी एकमेकांवर हल्लाबोल केला.
मंत्री लोढांनी माहिती सादर केल्यानंतर समाजवादी पार्टीते आमदार अबू आझमी यावर जोरदार आक्षेप नोंदवला. आझमींनी मागणी केली की, लोढा यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागायला हवी.आझमी म्हणाले, “लोढा यांनी विधानसभेत चुकीची माहिती सादर केली आहे. यामुळे त्यांना माफी मागायला हवी. कारण, लव्ह जिहाद नावाची गोष्टच अस्तित्वात नाही." यानंतर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आझमींची सुरात सूर देत, मागणी लावून धरली.
लोढांसाठी गुलाबराव मैदानात :
आझमी आणि आव्हाडांच्या केलेल्या मागणीनंतर गुलाबराव त्यांच्यासाठी धावून आले. पाटील म्हणाले की, “ज्यांना असं वाटतंय की, लव्ह जिहाद नावाची गोष्टच नसते, त्यांनी माझ्या गावाकडे यावं. माझ्या स्वत:च्या गावात दोन प्रकरणे झाली आहेत तुम्ही मुंब्र्यामध्ये राहताय म्हणून बोलू नका. तुम्हाला त्यांची आवश्यकता आहे, म्हणून बोलत आहात.”
लोढांनी माफी का मागायची? आशिष शेलारांचा सवाल..
भाजप नेते आशिष शेलार हे सुद्धा लोढांच्या समर्थनात धावून आले. शेलार म्हणाले की, “मंगलप्रभात लोढां यांनी माफी का मागायवा हवं? ते हिंदू भगिनींच्या हितासाठी बोलले म्हणून त्यांनी माफी मागायची का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अजित पवारांमुळे परिस्थिती निवळली :
या प्रश्नावर विधानसभेत गदारोळ माजला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला. पवार म्हणाले की, 'मला इतरकाही विषयांवर बोलण्याची परवानगी द्या. मंगलप्रभात लोढांचा जो विषय़ आहे. त्याप्रमाणेच, आव्हाड, गुलाबराव पाटील, शेलार यांनी जे काही बोलले, त्यातलं योग्य काय ते घ्या, आणि अय़ोग्य गोष्टींना बाजूला काढा, पुढचं कामकाज सुरू करा, अशी भूमिका पवारांनी घेतली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.