Maharashtra Assembly Winter Session : गडकरी साहेब पनवेल ते चिपळूण बसने प्रवास करून दाखवाच; भास्कर जाधव यांचे आव्हान

Bhaskar Jadhav On Nitin gadkari Over Mumbai Goa Highway Issue : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात भास्कर जाधव यांचे थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आव्हान...
Bhaskar Jadhav
Bhaskar JadhavSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Winter Session 2023 : नागपूर हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था आणि त्यावर होत असलेल्या अपघातांच्या घटनांवर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी टीका करत राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. 12 वर्षे झाल्यानंतरही या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप आमदार जाधव यांनी केला.

हिवाळी अधिवेशनामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतीमालाला भाव, जुनी पेन्शन योजना, कांदा निर्यात, अशा विविध विषयांवर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्ष, सदस्यांनी दिलेले राजीनामे यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार एकमेकांवर तुटून पडत आहेत.

Bhaskar Jadhav
Samant Vs Mhatre: तुम्ही 'त्या' रस्त्यावरुन कधी गेलात का? म्हात्रे-सामंतांमध्ये रंगली जुगलबंदी

मुंबई गोवा महामार्गावर मोठे खड्डे पडले असून 10 वर्षांत या रस्त्यावर 2010 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. 12 वर्षे झाली तरी आतापर्यंत फक्त 67 टक्के काम या रस्त्याचे झाले असल्याचे वास्तव समोर आले आहे. या रस्त्याच्या कामाबद्दल कोकणातील आमदार भास्कर जाधव यांनी कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. राज्य तसेच केंद्र सरकारला धारेवर धरले.

रस्त्याच्या कामाबद्दल केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची अनेकदा भेट घेतली. मात्र अद्यापही हा रस्ता पूर्ण झालेला नाही. या रस्त्याची नक्की अवस्था काय आहे? कोकणातील मंडळी यावरून कसा प्रवास करतात याचा अनुभव घ्यायचा असेल तर, त्यांनी एकदा या रस्त्यावरून प्रवास करून दाखवावा, असे आव्हान जाधव यांनी दिले. त्यांचे खात्याचे अधिकारी गडकरी यांना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कोकणातील आमदारांमध्ये एकी नसल्याने या रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याचेही जाधव म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'हा रस्ता झाला नाही त्याला मी जबाबदार असून यासाठी मी इतर कोणालाही जबाबदार धरणार नाही’,अशी भीमगर्जना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. या रस्त्यासाठी गडकरी यांनी तब्बल 80 बैठका घेतल्या. मात्र त्यांना यश मिळाले नाही. सर्व भारतात मला रस्ते बांधण्यासाठी त्रास झाला नाही, पण मुंबई गोवा महामार्ग मला दिलेल्या वेळेत पूर्ण करता आला नाही, याचे मला दुःख आहे, असेही नितीन गडकरी यांनी अनेकदा बोलून दाखविले आहे.

Bhaskar Jadhav
Mumbai News : मुंबईकरांनो, कबुतरांपासून दूर राहा! कारवाईसाठी क्लीनअप मार्शल तयार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com